त्वचारोग आणि होमिओपॅथी भाग 2 / Skin Diseases and Homeopathy Part 2

Dorctor Pic By Dr. Ajay HanmaneJune 20, 2023 Skin & Cosmatology

त्वचारोग आणि होमिओपॅथी भाग 2 —


Healthy Mind in Healthy Body” हे ब्रीदवाक्य आपण ही वर्षानुवर्षे ऐकत आलो आहोत, पण सहसा समजून घेत नाही.


   त्वचेला शरीराचे बाह्य आवरण म्हटले असले तरी तिचा मनाशी अतूट संबंध आहे. म्हणूनच मनुष्याला राग आल्यानंतर त्याचा चेहरा रागाने लालेलाल झालेला असतो किंवा भीती वाटल्यास चेहरा पांढरा पडत असतो. एखाद्या काळजीने ग्रासलेल्या माणसाची काळवंडलेली मूर्ती आपल्याला त्याच्या मनाची अचूक परिस्थिती वर्णन करते. अति विचारांमुळे काही जणांना पोटात अल्सर किंवा उच्च रक्तदाब किंवा निद्रानाश इत्यादी प्रकारचे शरीरावर होणारे परिणाम मनस्थितीमुळे होतात हे आमजनतेला माहित झाले आहे, पण ते परिणाम त्वचेवर होऊ शकतात याची जाणीव बऱ्याच व्यक्तींना अजून नाही.


   मनाचा तोल सुटला तर त्वचेवर त्याचे परिणाम दिसू लागतात , मग त्या परिणामांपासून ना मोठी माणसे सुटतात ना लहान मुले.
    

लहान मुलांच्या मनात काळजी असू शकते आणि त्यांच्या संवेदनशील मनावर कित्येक छोट्या-मोठ्या गोष्टींचा परिणाम खोलवर होत असतो व तो वर्षानुवर्षे राहतो.


लायकेन प्लॅनेस ( Lichen Planus)–  हा त्वचारोग सहसा अतिविचारातिरेकामुळे खूप जणांना होतो.


     एक छोट्या रुग्णामध्ये मला जेव्हा या रोगाची लक्षणे दिसली, तेव्हा खोलात जाऊन चौकशी केली असता असे लक्षात आले की टी.व्ही.वरील भीतीदायक मालिका पाहिल्यावर तीच्यात खूप भीती निर्माण झाली आणि पुन्हा ती मालिका सुरू झाल्यावर ती आतल्या खोलीत जाऊन बसत असे. या माहितीच्या आधारे होमिओपॅथिक औषधी सुरू केल्यावर लायकेन प्लॅनेस हा रोग ठीक झाला.


   एका निवृत्त गृहस्थांना घरातील कित्येक गोष्टींवरील आपली पकड सुटल्याची जाणीव झाली. आपले परावलंबित्व मनाला क्लेशदायक  वाटू लागले. मुलांच्या वागण्यात त्यांना आढ्यता दिसायला लागली. ते अंतर्मुख झाले आणि परिणामी त्यांच्या अंगावर भराभर लायकन प्लॅनसचे जांभळटसर, खूप खाजणारे डाग पसरू लागले. त्यांच्या मुलाला व सुनेला त्यांच्या या मानसिक अवस्थेची जाणीव करून दिली व त्यानुसार होमिओपॅथिक औषध उपचार सुरू केले. तसेच त्यांना छोट्या छोट्या कामात स्वतःला गुंतून घेण्याचा सल्ला दिला. हळूहळू ते डाग कमी झाले आणि निस्तेज झाले. त्यांची मनस्थिती देखील ठीक झाली.


          सर्व चिंताग्रस्त व्यक्तींना हे त्वचा विकार होतात असे नाही, पण त्यातल्या त्यात हळव्या प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये हे प्रकार सहसा दिसून येतात. विचारांनी संबंधित भागावर रासायनिक प्रक्रिया होऊन त्यातल्या नाजूक भागावर खाज येते किंवा केसांची मुळे त्यामुळे कमकुवत होऊन पुंजक्याने केस गळणे असे प्रकार होऊ शकतात, याची खूप रुग्णांना जाणीव नसते व ती करून दिल्यास त्यावर त्यांचा चटकन विश्वास ही बसत नाही.


     न्युरोडरम्याटायटीस ( Neurodermatitis) म्हणून इसब सारखा दिसणारा हा प्रकार सहसा पायाच्या घोट्याजवळ दिसतो. ज्या व्यक्ती संवेदनशील आहेत किंवा फार वक्तशीर किंवा शिस्तीच्या भोक्त्या आहेत अशा व्यक्तींमध्ये हा प्रकार दिसतो. ज्यांना रागावर ताबा ठेवता येत नाही, पटकन रागाच्या भरात बोलून गेल्यानंतर त्याबद्दल मनाला वाईट वाटते किंवा एखाद्या वेळी जवळच्या व्यक्तीच्या बोलण्याची तऱ्हा किंवा वागण्याची पद्धत सहन होत नाही  नसूनही त्याबद्दल काहीही बोलता किंवा करताना न आल्याने फोलपणाची भावना वाढते. तेव्हा त्वचेवरील या विशिष्ट डागावर खूप खाज येते.

सहसा व्यक्तीस्वातंत्रवादी सून आणि लुडबुडणारी सासू हे न जुळणारे समीकरण न्यूरोडरम्याटायटीसला कारणीभूत ठरू शकते होऊ शकते.


      वरिष्ठांच्या जाचा पुढे जर सतत मान तुकवावी लागत असेल किंवा मितभाषी भीडस्त वरिष्ठांच्या जोडीला जर ऊद्दाम, कामचोर, कनिष्ठ वर्ग असेल तर त्यांच्या घालमेलीचा लक्षण म्हणून न्यूरोडरम्याटेटिस दिसू शकतो. पण यामध्ये असे दिसून येते की जेव्हा व्यक्ती कामात मग्न असते त्यावेळी खाज येत नाही पण घरी आल्यावर, कपडे उतरविल्यानंतर खाज इतकी येते कि अगदी रक्त येईपर्यंत. सहसा मानेच्या मागे किंवा हाताच्या कोपऱ्याजवळ काळसर जाडसर खाजणारा डाग या प्रकारात दिसतो.


डरम्याटायटीस आर्टिफॅक्टा  ( Dermatitis Artifacta)
म्हणून एक त्वचारोग काही अतिसंवेदनशील व्यक्तींच्या बाबतीत दिसून येतो. नकारात्मक भावनांचा उद्रेक झाला तर शरीराच्या दर्शनी भागावर दिसेल अशा पद्धतीने रुग्णांकडून सतत काही ओरखडे काढल्याप्रमाणे जखमांसारखे व्रण केले जातात.जेव्हा विचारले असता, आपण मुद्दाम न केल्याचे ते रुग्ण सांगतात.


    एका तरुण मुलीला प्रेमभंगाच्या दुःखात भर म्हणून आपल्याला दिवस गेले असल्याचे समजल्यावर शरीरावर हे डाग दिसू लागले. या उद्रेकी भावना कमी करण्यासाठी होमीओपॅथिक औषध सुरू केल्यावर व मनोबल वाढविण्याचे उपाय सांगून त्या घटनेची तीव्रता कमी करणारे व्यावहारिक उपाय योजून हा प्रकार आटोक्यात आणला गेला.


    आपल्याला झालेल्या एखाद्या रोगाबद्दल जेव्हा रुग्णाच्या मनात अतिघृणा येते त्यावेळी ते कोणाला कळू नये या धडपडीपायी सुद्धा त्याच्या त्वचेवर काळसर डाग दिसतात. आपल्या हातून घडलेले एखादे गैरकृत्य जर मनाला टाचत असेल तर त्या रुग्णाचे तोंड काळवंडल्यासारखे दिसते आणि तो रुग्ण वारंवार तोंडावरून हात फिरवून ते दुष्कृत आपल्या मनामधून पुसून काढण्याचा प्रयत्न करीत असतो.


      एक-दोन मातांना आपल्या मुलांच्या बाबतीत अतिकाळजी करण्याच्या स्वभावामुळे त्वचेवर खाजणारे इसब सारखे चट्टे झाले होते.


     मुलांच्या बेदरकार वागण्यामुळे त्यांच्या जीवनात जीवाला खंत वाटायची वयाने वाढलेल्या मुलाला बोलण्याची ही चोरी होती. मग स्वत:ला दोष देत असे त्याची प्रतीक्रिया त्वचेवर दिसत असे.


     मिळालेल्या नोकऱ्या घरी सोडून बसणाऱ्या तिशीच्या मुलाला घालून पाडून बोलून नंतर त्याबद्दल स्वतः वाईट वाटून घेणाऱ्या शेजारच्या काकींना त्यांच्या अंगावर केव्हाही खास सुटण्याची जाणीव व्हायची.


     थोडक्यात एखाद्या व्यक्तीच्या त्वचेवर एकंदर ठेवणीवरून व त्यावर दिसणाऱ्या डागांवरूनही त्याच्या मनाचा ठाव घेता येतो. 
    होमिओपॅथिक चिकित्सा पद्धती ही व्यक्तीनुरूप  (Individual) असल्यामुळे त्वचारोगात देखील रुग्णांची मानसिकता, त्याचे राहणीमान, खाणे-पिणे सवयी, आचार-विचार, सभोवतालच्या वातावरणाचा त्यांच्या शरीरावर होणारा परिणाम या सर्व बाबींचा औषधांची निवड करताना विचार केला जातो. त्यामुळेच होमिओपॅथिक औषधाने अनेक असाध्य त्वचारोग कायमचे बरे होतात.

 

डॉ. अजय हनमाने
एम. डी. (होमिओ)
चैतन्य होम्योपैथिक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4
शाहुपुरी व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
मोबाईल- 7738667123
रविवारी बंद 

कृपया पुढील लेख वाचा  —

 मुलांची स्व-प्रतिमा


Skin Diseases and Homeopathy Part 2


Healthy Mind in Healthy Body’ is a motto we have been hearing for years, but often don’t understand.


Although the skin is called the “outer covering of the body“, it is inextricably linked with the mind. That is why when a person gets angry, his face turns red with anger or when he is afraid, his face turns white. A darkened image of a worried man describes to us the exact state of his mind. It is common knowledge that overthinking can cause stomach ulcers or high blood pressure or insomnia in some people due to mood, but many people are still not aware that these effects can also affect the skin.


If the Mind is out of balance, its effects will be seen on the skin, then neither adults nor children can escape from those effects.


Young children can have worries and their sensitive minds can be deeply affected by many small things that last for years.


Lichen Planus

This skin disease is usually caused by overthinking.
When I found symptoms of this disease in a young patient, on further investigation it was found that watching a scary serial on T.V. made her very afraid and when the serial started again she would go and sit inside the room. Lichen planus was cured after starting Homoeopathic medicine based on this information.


A retired gentleman realizes that he has lost his grip on many things in the house. Our dependence began to feel painful. He began to see superiority in the children’s behavior. They became introverts and as a result developed purple, very itchy patches of lichen planus. Made his son and daughter-in-law aware of his mental condition and started Homoeopathic medicine treatment accordingly. He also advised them to engage themselves in small jobs. Gradually the spots reduced and faded. His mood also improved.


Not all anxious people get these skin disorders but it is more common in sensitive people. A lot of patients are not aware of the fact that chemical treatment on the affected area causes itchiness on the delicate part or weakens the hair roots and leads to massive hair loss.


Neurodermatitis

which looks like Eczema, usually appears near the ankles. It is seen in people who are sensitive or very punctual or disciplined. Those who cannot control their anger, feel bad about it after speaking quickly in anger, or sometimes cannot tolerate the way someone close to them speaks or behaves, but does not say or do anything about it. Then this particular spot on the skin becomes very itchy. Often the mismatched equation of an individualistic daughter-in-law and a doting mother-in-law can lead to neurodermatitis.


Neurodermatitis can be seen as a sign of frustration if the seniors are constantly bowing down, or if a pair of reticent, intimidating seniors have a boisterous, fussy, underclassman. But this shows that when the person is engaged in work it does not itch but when he comes home, after undressing the itching is so severe that it even bleeds. A black, thick, itchy rash usually appears on the back of the neck or near the corners of the arms.


Dermatitis Artifacta

It is a skin condition seen in some hypersensitive individuals. When negative emotions flare up, the patient constantly scratches the surface of the body in such a way that the sores appear.


A young girl gets these marks on her body when she realizes that her days have passed, adding to the grief of a breakup. This was brought under control by starting Homoeopathic medicine to reduce these outbursts and practical measures to reduce the severity of the episode by prescribing morale boosters.


When a patient has a lot of hatred for a disease he has, dark spots appear on his skin even though he is trying hard not to let anyone know about it. If a bad deed done by one’s hands is bothering the mind, then the patient’s mouth looks black and the patient tries to wipe the evil from his mind by repeatedly running his hand over his mouth.


A couple of mothers developed itchy eczema-like rashes due to their child’s overprotective nature.


It was a steal to speak to a grown-up boy who regretted his life because of the careless behavior of the children. Then his reaction of blaming himself was visible on the skin.


The neighborhood aunts who used to talk down to the 30-year-old boy who left the jobs at home and later felt bad about it, always felt a special release on his body.


In short, one can get a sense of a person’s mind from the overall appearance of the skin and from the spots that appear on it.
Since Homoeopathic treatment methods are individual, even in dermatology, the mentality of the patient, his living conditions, eating and drinking habits, conduct and thinking, the effect of the surrounding environment on his body are considered while choosing the medicines.

That is why many incurable skin diseases can be cured permanently with homeopathic medicine.

 

Dr. Ajay Hanmane
M. D. (Homeo)
Chaitanya Homeopathic Clinic
Bhaskar Plaza- F4
Shahupuri Vyapari Peth
Near Railway Gate Bhaji Mandai
Kolhapur- 416001
Mobile- 7738667123
Sunday Closed

 

Please Read Next Article

Children’s Self-image