मानसिक समस्या आणि होमिओपॅथिक उपचार / Psychological Problems and Homoeopathic Treatment
By Dr. Ajay Hanmane
June 17, 2023 Mental Health Psychiatry
मानसिक समस्या आणि होमिओपॅथिक उपचार–
मानसिक समस्येवर नक्कीच होमिओपॅथिक उपचार आहेत. मानसशास्त्र व वैद्यकशास्त्र यात होत असलेल्या संशोधनानुसार अधिकाधिक आजार हे मनोंकायिक- सायकोसोमेटिक (Psycho-Somatic) स्वरूपाचे मानले जात आहेत.
आजपर्यंत रोगप्रतिकारशक्ती ( Autoimmunity) ही शरीरातील यंत्रणा स्वयंनियंत्रित मानले जात होते. परंतु आता मानसिक ताणामुळे प्रतिकार क्षमतेवर परिणाम होतो हे सिद्ध झालं आहे.
कॅन्सर या रोगाबद्दल आजपर्यंत बरंचसं अज्ञानच होतं. पण काही संशोधकांनी हा कॅन्सर रोग देखील मनोंकायिक – सायकोसोमेटीक (Psycho-Somatic) रोग असल्याचे प्रतिपादन केल आहे.
शरीर आणि मन दोन्ही जुळलेलेच असतं. व्यवस्थित व्यायाम केला तर मनावरचे ताण कमी होतात आणि त्यात कॅन्सर पेशंटलाही फायदा होतो असं संशोधन सांगतं.
मानसिक आरोग्य हे अतिशय महत्त्वाचं असतं हे सर्वांनाच माहित आहे. पण मानसिक आरोग्य म्हणजे काय ?
1.जगण्याविषयी आसक्ती असणं.
2. आचरण चार चौघांसारखं असणं
3.स्वतःवर ताबा, अतिरेकी भावनांवर नियंत्रण असणं.
4. कठीण प्रसंगाला तोंड देता येणे. योग्य निर्णय घेण्याची कुवत असणं.
5.समाजमान्य व कायदेशीर वर्तन असणं.
6. सामाजिक सहभाग असणं, इतरांची जुळवून घेता येणं.
7. व्यक्तिगत्व कुटुंबाच्या गरजांचा समन्वय साधता येणं.
8. ‘बोले तैसा चाले ‘ अशी वागणूक असणं.
9. वास्तवाचा स्वीकार करता येणं.
10. स्वतःच्या चुका / उणिवा जाणणं. आत्मपरीक्षण करता येणं-मात्र स्वतःला कमी न लेखणं .
11.जीवनाविषयी, आशावादी स्वतःविषयी समाधानी असणं.
होमिओपॅथी मध्ये रुग्णांचे संपूर्ण व्यक्तिमत्त्व विचारात घेतलं जातं. त्यात त्याच्या मनाला सर्वाधिक प्राधान्य दिले जातं.
मानसिक आरोग्य समतोल राखण्यात तसेच ते परत मिळवून देण्यात होमिओपॅथीचे महत्त्वाचे योगदान असते. या औषधोपचारांमुळे शारीरिक व्याधींबरोबरच मानसिक असंतुलन ही संतुलित केलं जातं.
उदाहरणार्थ– ॲंक्शियस पर्सनॅलिटी मध्ये (Anxious Personality)– त्या व्यक्तींमध्ये गोष्ट एक आहे की पेशंटला टेन्शनमध्ये राहणं आवडतं किंवा सवयच झालेली असते. त्याचबरोबर शारीरिक दुखणी भरपूर असतात. जणू काही त्या दुखणी म्हणजे त्याच्या फांद्याच असतात.
एखाद्याचा स्वभाव लहानपणापासूनच घाबरट असतो. परीक्षेची भीती असते. तसेच इतर गोष्टींचीही… स्वभावाला उत्तर नाही पण तो पूर्ण चुकीचा असतो असे नाही. स्वभावातील काही गोष्टी स्वतःला किंवा इतरांना त्रासदायक ठरू शकतात एवढेच. त्यामुळे तो त्रास कमीत कमी होईल या दृष्टीने थोडी शिस्त लावणं, मोल्ड करणं, एवढं करणं गरजेचं असतं.
सायकॅट्रिक ट्रीटमेंटने (Psychiatric Treatment) थोडा बहुत कंट्रोल करता येतो, पण ते खर्चिक असतं. शिवाय काही साईड इफेक्ट होऊ शकतात. पण वयोमानानुसार स्वभावाला मोल्ड करणं तसं सोपं नसतं.
आयुष्यात खूप काही करावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. त्यासाठी सगळे आपापल्या परीने प्रयत्न करत असतात. पण मुळात प्रकृतीची साथ हवी, ती नसेल तर बऱ्याच अडचणी येऊ शकतात. त्यातही ऐन उमेदीच्या वयात प्रकृतीने साथ दिली नाही तर करिअरला खूप मर्यादा येतात.
होमिओपॅथीच्या तत्त्वानुसार मूळ प्रवृत्तीवर उपचार केले म्हणजे जिथून पाणी मुरते, झिरपते तेथे दुरुस्ती केली की ओल आपोआप थांबते. तसेच आहे.
होमिओपॅथी मध्ये तीन प्रकारची कारणे असतात
- फंडामेंटल (Fundamental),
- एक्साइटिंग( Exciting) आणि
- मेंटेनिंग(Main thing).
जर चिंताग्रस्त व्यक्तीमत्व हे मूळ कारण असेल म्हणजे सगळे आजार त्यांच्या मूळ प्रवृत्तीची निगडित असतात. आजार उद्भवण्यासाठी एक्साइटिंग कॉज ( Exciting Cause) म्हणजे निमित्त आले ते एखाद्या शारीरिक आजाराचं. असे विश्लेषण हे फक्त होमिओपॅथित केले जातात म्हणून अशा आजारांवर होमिओपॅथितच परिणामकारक उपचार होऊ शकतात.
मानसिक उपसारासाठी होमिओपॅथी कशी उपयुक्त ठरू शकते याचं आणखी एक उदाहरण म्हणजे-
पी टी एस डी (PTSD) म्हणजे पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर- आपल्याला हृदयाचा त्रास आहे, हे कळल्यानं पेशंटला जो मानसिक धक्का बसतो, तेथून पुढची कहाणी किंवा दुखणे सुरू होतात.
होमिओपॅथीच्या शास्त्रात या घटनेला एक्सायटिंग कॉज (Exciting Cause) म्हटलं जातं. त्यानंतरचे आधुनिक शास्त्रातील औषध उपचार, सर्जरी, त्यावेळचे ताण त्यातच कुटुंबातील काही घडलेल्या घटना, ताण-तणाव इत्यादी, विविध कारणांनी जर त्रास वाढत गेले तर त्या घटनांना मेंटेनिंग कॉज (Maintaining Cause) म्हटलं जातं.
मानसिक धक्क्यातून सुरू झालेलं दुखणं आणि नंतरच्या मानसिक ताणांमुळे बळावत गेलेले दुखणं, यामध्ये होमिओपॅथी त्यांच्या शारीरिक लक्षणांवरच नव्हे तर मूळ मानसिक असमतोलावर उपचार करते. त्यामुळे होमिओपॅथिक औषधांमुळे मानसिक संतुलन प्रस्थापित होते. तशी सगळी तथाकथित शारीरिक दुखणी देखील बरी होतात.
काही माणसं आयुष्याच्या आयुष्य एखादं दुखणं सोसत काढत राहतात. मिळेल ते औषध घेत आलेला दिवस ढकलत राहतात. पण स्वास्थ्य असे नसतचं. दुखणं जणू त्यांच्या मानगुटीवरचं बसलेलं असतं. सणाचे दिवस येतात जातात. समारंभ साजरे होतात. आयुष्यात खूप काही घडत राहतं, पण जीवाला स्वस्थताच नसेल तर आयुष्य आनंदाने जगायचे कसे ?
असे शारीरिक व्याधी अनेक वर्ष सहन कसणारे पेशंट बऱ्याचदा डॉक्टरांनंकडे येऊन आपली व्यथा मांडत असतात. त्यांना एकाच वेळी वेगवेगळ्या आजारांसाठी औषधं तसेच शक्तीवर्धक गोळ्या, टॉनिक यांचा भडीमार चालू असतो. तो कमी म्हणून की काय, मनोविकारतज्ञांकडून घेतलेल्या टेन्शनसाठी आणि झोपेच्या गोळ्या चालू असतात. एवढं करूनही प्रकृतीत सुधारणा होत नसतं. उलट प्रकृती अधिकच ढासळत असते. वेदनांमुळे बिघडते स्वास्थ ढासळलेलं असल्यामुळे आत्मविश्वास डळमळीत होतो. याच्यामुळे पेशंट नैराश्याच्या भावनेमध्ये अडकतात आणि त्यातच खोल खोल गुरफटत जातात.
अशा पेशंट्सना होमिओपॅथिक औषधांमुळे संपूर्णपणे शंभर टक्के बरे करता येते,म्हणजे पेशंट निराशाच्या , नैराश्याच्या भावनेमधून बाहेर पडतो. नकारात्मक विचार कमी होऊ सकारात्मकता वाढू लागते, गमावलेला आत्मविश्वास परत येऊ लागतो आणि त्याचबरोबर होमिओपॅथीच्या औषधांचे कसलेच साईड इफेक्ट नसल्याने औषध खाण्यामध्ये कोणतीही तक्रार पेशंट करत नाही आणि पेशंटला अगदी आनंदी परिपूर्ण कौटुंबिक जीवन जगता येते.
वरकरणी शारीरिकच वाटणाऱ्या दुखण्याचे मूळ, मानसिकतेतही असू शकतं व ते होमिओपॅथीने दूर करता येऊ शकतं.
म्हणजे होमिओपॅथिक उपचारामुळे व्यक्तिमत्त्वात योग्य तो सकारात्मक बदल घडतोच त्याचबरोबर कामातील एफिशियन्सी(Efficiency)- उत्साह कमतरता कमी झाल्यामुळे व्यवसायात, दैनंदिन कामात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते ते पूर्णपणे बंद होते आणि इतर शारीरिक आजार जे आहेत ते सुद्धा कंट्रोल किंवा पूर्णपणे बरे होण्यास मदत होते.
म्हणून, जे लोक मानसिक ताणतणावातून बरे होतात ते प्रत्येक होमिओपॅथिक डॉक्टरला येऊन धन्यवाद देतात आणि म्हणतात, “होमिओपॅथी हॅज सेव्हड् मी”( Homoeopathy has saved me).
डॉ अजय हनमाने
एम. डी. (होमिओ) HHF, ICR Kolhapur,
चैतन्य होम्योपैथिक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4
शाहुपुरी व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
मोबाईल- 7738667123
रविवारी बंद
कृपया पुढील लेख वाचा —
होमिओपॅथी विषयी थोडेसे – भाग एक
————————————————————–
Psychological problems and Homoeopathic treatment-–
There are certainly Homoeopathic remedies for Psychological problems. According to the research in Psychology and Medicine, more and more diseases are considered to be Psychosomatic in nature.
Until now, Immunity was considered to be a self-regulating mechanism(Auto-Immune System) in the body. But now it has been proven that mental stress affects immunity.
Until now there was a lot of ignorance about cancer. But some researchers have asserted that cancer is also a Psychosomatic disease. Both Body and Mind are connected.
Research shows that regular exercise reduces stress and can benefit cancer patients as well.
Everyone knows that Mental Health is very important. But what is Mental Health?
1. Being attached to life.
2. Behavior to be like other Common People
3. Self-control, control over violent emotions.
4. Ability to face difficult situations. Being able to make the right decisions.
5. Having social and legal behavior.
6. Being socially involved, being able to adapt to others.
7. Ability to coordinate individual and family needs.
8. Having a walk-or-talk attitude
9. Being able to accept reality.
10. Realizing one’s own mistakes / shortcomings. Being introspective—but not writing yourself down.
11. Being optimistic about life, self-satisfied.
In Homoeopathy the whole personality of the patient is taken into consideration. In it, his Mind is given the highest priority. Homoeopathy plays an important role in maintaining and restoring Mental Health balance. Due to these medicines, mental imbalance is balanced along with physical ailments.
For example, in an Anxious Personality, one thing is that the patient likes or is used to being under tension. At the same time, there are many physical pains. As if those pains are his branches. One’s nature is fearful from childhood. Fear of exams. And so do other things…
Natural Dispositions doesn’t have an answer but it’s not completely wrong. It’s just that some things in Nature can be annoying to yourself or others. Therefore, it is necessary to apply some discipline, mold, and so on in order to reduce the problem to a minimum.
Psychiatric treatment can provide some control, but it is expensive. Also some side effects may occur. But it is not so easy to mold Nature according to age. Everyone wants to do a lot in life. Everyone is trying their best for that. But basically you need the support of Health, if it is not there, many problems may arise. Even at the Young age of career if the Health does not support, the career will be very limited.
According to the principle of Homoeopathy, if the root tendency is treated, the place where the water seeps and drains is repaired, then the water stops automatically. It is as well.
In Homoeopathy there are three types of causes which are
- Fundamental,
- Exciting and
- Maintaining.
If the Anxious Personality is the root cause, then all diseases are linked to their underlying tendencies. An Exciting Cause for the occurrence of a disease is a physical disease. Such analysis is done only in Homoeopathy so such diseases can be treated effectively in Homoeopathy only.
Another example of how Homoeopathy can be helpful for psychological support is PTSD (Post Traumatic Stress Disorder) – the Psychological trauma that a patient experiences after learning that they have a heart problem, which triggers the next story or pain.
In the science of Homoeopathy, this phenomenon is called Exciting Cause. Subsequent medical treatment in modern science, surgery, stress at that time, some events that happened in the family, stress, etc., if the problem increases due to various reasons, then those events are called as Maintaining Cause.
In both pain triggered by Mental shock and pain aggravated by subsequent Mental stress, Homoeopathy treats the underlying Mental imbalance, not just their physical symptoms.
Hence, Homoeopathic medicines establish mental balance. All so-called physical pains are also cured.
Some people spend their whole lives in pain. They keep postponing the day of taking the medicine. But Health was not like that. The pain seems to be sitting on their neck. Festival days come and go. Ceremonies are celebrated. A lot of things happen in life, but if life is not Healthy, how to live life happily?
Patients who have been suffering from such physical ailments for many years often come to the doctor and express their pain. They are simultaneously bombarded with medicines for various ailments as well as tonics and tonics. As it is less, the tension and sleeping pills taken by the psychiatrist are on. Even after doing all this, the condition does not improve. On the contrary, the condition deteriorates more and more. Due to pain, self-confidence is shaken due to poor health. Due to this, the patient gets stuck in a rut of despair and sinks deeper into it.
Such patients can be completely cured by Homoeopathic Medicines, i.e. how the patient comes out of despair. Negative thinking starts to decrease, positivity starts to increase, the lost confidence starts to return and at the same time, as there are no side effects of Homoeopathic medicines, the patient does not complain in taking the medicine and the patient can lead a very happy and perfect family life.
Aches and pains that seem to be Physical can also be Psychological in origin and can be treated with Homoeopathy. That is, due to Homoeopathic treatment, there is a positive change in the personality at the same time due to the decrease in work efficiency-enthusiasm, many difficulties faced in business, daily work are completely stopped and other physical diseases are also controlled or completely cured.
So people who recover from Mental stress come and thank every Homoeopathic doctor and say, “Homeopathy has saved me“.
Dr Ajay Hanmane
M.D.(Hom)HHF,ICR Kolhapur,
Chaitanya Clinic
1st Floor, F4,Near HDFC Bank
Bhaskar Plaza Vyapari Peth,
Near Panch Bunglow Bhaji Mandai
Kolhapur, 416001
Mobile No. 7738667123
Sunday Closed
Please Read Next Article–
A Little About Homeopathy – Part One