असमान जग – मानसिक स्वास्थ्य आणि मानसिक आजारांवर होमिओपॅथी / An Unequal World – Homoeopathy on Mental Health and Mental Illness

Dorctor Pic By Dr. Ajay HanmaneJune 17, 2023 Anxiety Homeopathic and Cure Mental Health Mental Health Psychiatry

असमान जग – मानसिक स्वास्थ्य आणि मानसिक आजारांवर होमिओपॅथी —

 

10 ऑक्टोबर हा वर्ल्ड फेडरेशन ऑफ मेंटल हेल्थ या संस्थेतर्फे जागतिक मानसिक स्वास्थ दिवस म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी या संकल्पनेवर आधारित उपक्रम वर्षभर राबवून त्यानुसार समाजाच्या सर्व स्तरात या दृष्टीने कार्य केले जाते.
मन आणि मनाचे आजार याबाबतीत अजूनही सर्वांच्या मनात काही भीती, संभ्रम, कुतूहल, शंका, अनेक प्रश्न  आहेत.
आजही एकविसाव्या शतकात आपल्याला मानसिक आजाराबद्दल पूर्णतः माहिती नाही. अजूनही आपण बऱ्याच वेळा ऐकीव माहिती अथवा इंटरनेट किंवा गूगल  विद्यापीठाच्या माहितीवर अवलंबून असतो.
आजही मानसोपचार तज्ञम्हंटले की सर्वांच्या भुवया वर उंचावल्या जातात आणि प्रश्नांमध्ये शंकेचा स्वर येतो. डॉक्टर ! कशासाठी सुचवता आहात???
भीतीचा अतिरेक !!!
कोरोनाचा धुमाकूळ चालू असताना एके दिवशी सकाळीच विजय नावाचा 25 वर्षाचा युवक धावत आला आणि म्हणाला, “मला ताबडतोब औषध द्या, नाहीतर माझे खरे नाही. मी बहुतेक मरणार! मला खूप त्रास होत आहे. दम लागत आहे. प्लीज तुम्ही काहीतरी करा.
त्याची सखोल शारीरिक तपासणी केली असता तसे काही घाबरण्याचे अथवा आजाराचे कोणतेही लक्षण त्यामध्ये दिसून आले नव्हते. त्याला  काही काळ शांत करून त्याच्याशी बोलल्यावर असे लक्षात आले की, तो नोकरीच्या निमित्ताने एकटाच राहत होता. प्रवासाच्या निर्बंधामुळे तो घरी जाऊ शकत नव्हता अथवा घराकडून तो राहत असलेल्या ठिकाणी कोणी येऊ शकत नव्हते. त्याच्या बिल्डिंगमध्ये या घटनेच्या काही दिवस अगोदर एक व्यक्ती मरण पावली होती आणि त्याच्या मृत्यूचे काहीच कारण लक्षात आले नव्हते. त्याचे निधन कोरोनामुळे झाले आहे अशी बिल्डिंगमध्ये चर्चा होती. विजयने त्या मरण पावलेल्या व्यक्तीस सोबत आदल्या दिवशी बराच काळ घालवला होता. कोरोणाची खूपच भीती विजयच्या मनात राहिल्यामुळे तो रात्रभर झोपू शकला नव्हता. त्याच्या मनात रात्रभर विचार सुरू होते, “आता माझे काय होणार”??
सकाळ होताच तो दवाखान्यामध्ये धावत आला.
असे काय झाले असेल विजयला? मानसिक भीती असणारा ‘विजय” हा एकमेव व्यक्ती होता की असा त्रास असलेले अनेक जण या भावनेमधून गेले होते ?
डिसेंबर 2019 पासून कोरोनाने सर्व जगालाच विळखा घातला होता आणि आज पर्यंतच्या जगात, जगण्याची एकच वेगळी व्याख्या जन्माला आली होती. “एकमेकांपासून दूर राहा. दो गज की दूरी, है जरुरी है |” म्हणता म्हणता ही दूरी आपल्यालाच त्रास द्यायला लागली. माणसे एकमेकांपासून लांब गेली. अगदी जवळ असूनही एकमेकांचा स्पर्श,भावनिकताया सर्वांचे महत्त्व आणि गरज जाणवू लागली.
कोरोनाच्या भीतीमुळे अथवा ज्या अनुभवातून माणसे गेली, त्यामुळे त्यांचे मन “भित्र्या सशाप्रमाणे”झाले. प्रत्येक गोष्टीसाठी ते विनाकारण घाबरायला लागले. काही स्वतःच्या हिमतीवर या भीतीतून बाहेर पडले पण काहींना ते जमले नाही. उपचारांची मदत घ्यावी लागली. वारंवार मदत घ्यावी लागली. असे का ?कशामुळे?या चर्चांना उधान आले.
खरंच का, मानसिक उपचारांची गरज हवी आहे का ? काय असतात मानसिक आजार ? आणि कोरोनामुळे असे कुठले मानसिक आजार जन्माला आले ?
आता आपण दुसरे उदाहरण पाहू–
नमिता नावाची एक आय.टी.प्रोफेशनल वैतागलेल्या मूडमध्ये दवाखान्यात भेटायला आली.  कशा आहात? हा साधा प्रश्न विचारताच, ज्वालामुखी फुटावा तसा तिचा राग तोंडातून बाहेर पडत होता. आणि किती म्हणून मीच एकटीने सर्व करायचे? स्वयंपाक मीच करायचा, मुलांकडे मीच बघायचे, सर्वांचे मीच एकटीने करायचे आणि वर माझे काम मीच सांभाळायचे !! 
 तिचा नवरा तिला कोणत्याही कामात मदत करत नव्हता कारण त्याला कामाची सवयच नव्हती. तिचा त्रागा समजण्यासारखा होता, पण त्यावर उपाय काय ? याचा विचार कोणी केला नव्हता.
आजही 21व्या शतकात, भारतीय कुटुंब पद्धतीत मग तो एकत्र असो किंवा विभक्त, घरातील कामे ही स्त्रीनेच करायची असतात, अशीच मानसिकता आहे. कधी बदलणार ही मानसिकता ?
तिच्या नवऱ्याचे म्हणणे असे होते की, तिला नोकरी करण्यामध्ये रस होता तर नमिताचे म्हणणे असे की, त्याला शिकलेली आणि नोकरी करणारी बायको हवी होती.
जगात सर्वच ठिकाणी, अस्थिरतेचे आणि अनिश्चिततेचे वातावरण त्या कोरोना मुळे झाले आहे. घरून काम करू शकतात त्यांचे कामाचे तास आणि ताप वाढला आहे. जे कामावर जाऊ शकत नाहीत त्यांना नोकरी गमवावी लागली अथवा नवीन नोकरी (जी कमी पगाराची असू शकते) शोधावी लागली. त्यामुळे एक प्रकारची असमानता निर्माण झाली.
समाजाच्या सर्व स्तरांना एक मोठा सारखाच त्रास देतोय तो म्हणजे आर्थिक व्यवहाराची बदललेली घडी. बऱ्याच कुटुंबातील व्यक्तींच्या नोकरीवर गदा आली, काहींना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या, काहींना बंद रेल्वे सेवा मुळे त्रास प्रवास करता येत नव्हता म्हणून नोकरी सोडावी लागली. काहींच्या कामाचे तास वाढवले गेले आणि नोकरी वाचविण्यासाठी ते तास जास्त वेळ ऑनलाईन राहू लागले आणि इतरांपासून दूर गेले. काही कुटुंबामध्ये कमावती व्यक्तीच कोरोनामुळे मरण पावल्यामुळे सर्व कुटुंबाची वाताहत झाली. ज्या व्यक्तींना कोरोना झाला त्यांची तर एक वेगळीच अवस्था झाली.
गरीब वृद्ध अपंग आणि स्थलांतरित लोकसंख्येच्या बरोबरीने महिलांना साथीच्या रोगाचा फटका बसला आहे. लिंग विषमता वाढत आहे.
दिलीप ची चिंता –
दिलीप हा गावात रिक्षा चालवणारा व्यक्ती. रोज सकाळी नित्यनीयमाने कामे करणारा. दिलीप गेले काही दिवस सकाळी उठत नव्हता. कोणतीही कामे करायची त्याची इच्छा होत नव्हती. जेवण आणि झोप कधीच पळाली होती. सुरुवातीला बायकोने सर्व सांभाळून घेण्याचा प्रयत्न केला, पण नंतर मात्र ती हा डोलारा सांभाळू शकत नव्हती. म्हणून त्याची बायको त्याला उपचारासाठी माझ्या दवाखान्यामध्ये घेऊन आली.
दिलीपशी बोलल्यावर असे लक्षात आले की, वाहतुकीच्या निर्बंधामुळे कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात व्यवसाय झाला नाही. आणि नंतर मर्यादित प्रवासी संख्येच्या नियमामुळे त्याचा उत्पन्नावर विपरीत परिणाम झाला. त्यातच पेट्रोल डिझेलचे भाव वाढत होते. अशा परिस्थितीत कसे जगायचे? मुलांचे ऑनलाईन शिक्षण कसे करायचे?या अशा त्याच्या वागण्याचे गांभीर्य त्याला समजलेच नाही. या ज्वलंत प्रश्नांची उत्तरे न मिळाल्यामुळे दिलीप जास्तच निराश होऊ लागला आणि योग्य मार्गदर्शन व उपचार न मिळाल्यामुळे तो नैराश्याच्या आहारी गेला होता.
ज्यांचे पोट हातावर आहे त्यांच्याबद्दल फारच वाईट परिस्थिती आली आहे. या सर्व गोष्टींमुळे निराशा, नैराश्य, चिंता ,काळजी उदासीनता या भावनांचा कल्लोळ मनामध्ये उठणे साहजिक आहे. मनुष्य आनंदात असेल तर त्याच्या मनात नेहमीच आनंदी भावना उत्पन्न होते पण अस्थिरतेच्या काळात नेहमीच अशा नकारात्मक भावना निर्माण होतात. यात समाजातील सर्वच व्यक्ती, जाती जमाती, धर्मातील व्यक्तींचा समावेश आहे.
पण स्त्री पुरुष लहान मुले यांना पण या आजारामुळे पण त्रास सहन करावा लागला आहे.
लहान मुलांचे वागणे खूपच बदललेले आहे. चंचलता,अस्थिरता, चिडणे, ओरडणे राग व्यक्त करणे, हट्टीपणा वाढणे इत्यादीचे स्वरूप खूपच बदललेले आहे.
कोविड 19 साथीचा गंभीर परिणाम समाजामध्ये स्पष्टपणे दिसतो आहे. लाखो लोक मृत्युमुखी पडले आणि 120 दशलक्ष लोक गरिबीकडे ढकलले गेले. जागतिक मंदी दुःख गरिबी वाढली आहे. विषमतेवर साथीच्या रोगाचा परिणाम स्पष्ट दिसून येत आहे.
असमानता ही आव्हानात्मक संकल्पना आहे,ज्याच्यावर निश्चित विधान करणे अवघड आहे.
  • कशाची असमानता ?
  • घरगुती उत्पन्नाची की जेडीपी दरडोई ?
  • कोणाकोणा मध्ये असमानता ?
  • ती व्यक्ती व्यक्तींच्या स्तरावर पाहिली पाहिजे.
  • साथीच्या काळात जागतिक उत्पन्न असमानता कशी बदलली ?
वरील सर्व उदाहरणे वाचताना आपल्याला  जाणीव झाली असेल, हे तर काय नेहमीचेच  आहे. सगळेच अशा भावनांतून जातात म्हणून त्या लगेच मानसोपचार तज्ञाकडे जायचे का ?
परंतु वरील सर्व उदाहरणांमधून एक गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे की, विजयच्या मनात ही भीतीची भावना निर्माण झाली, ती  जर योग्य वेळी निपटून टाकली नाही तर पुढे जाऊन हा विजय, प्रत्येक गोष्टीची भीती घेऊ शकतो. कोणतेही काम करण्याच्या आधी भीतीने त्याचा कॉन्फिडन्स डळमळू शकतो आणि त्याचे व्यक्तिमत्व भित्रे होऊ शकते.
नमिताच्या मनाचा रागाचा जर निचरा योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने नाही झाला तर ती सतत चिडचिड करत  राहिली तर परिणामी तिचा स्वभाव चिडका होईलआणि प्रत्येकाची ती चिडून बोलून तिचे मन:स्वास्थ्य घालवून बसेल. ती रागाने धुमसत राहिली तर तिच्या शरीरावर बरेच दुष्परिणाम होऊ शकतात जसे की, रक्तदाब वाढणे, हृदय विकार होणे इत्यादी.
दिलीपच्या बाबतीत जर तो जास्त हाताश झाला तर तो नंतर कोणत्याही गोष्टीत उभारीने काम करू शकणार नाही. सतत नकारात्मक विचार त्याच्या मनात येत राहतील आणि ती नकारात्मकता त्याच्या वागण्यात बोलण्यात सतत दिसून येईल.
असमान जग – मानसिक स्वास्थ्य आणि होमिओपॅथी या विषयानुसार विविध प्रकारचे अनुभव मानसोपचार तज्ञांना आले आहेत. मानसिक आजार ग्रस्त रुग्णांना असलेली भीती, नैराश्याचे परिवर्तन, मानसिक आजारात होऊ शकते. ते टाळण्यासाठी मानसिक आजाराची लक्षणे दिसल्यास त्यावर त्वरित  वैद्यकीय उपचार घेणे गरजेचे आहे.
चिंता, भीती, चिडचिड, सतत तणावाखाली राहणे, निराशा, नकारात्मक विचार ही सर्व मानसिक आजाराची लक्षणे असू शकतातआणि वेळेत ही लक्षणे ओळखली नाही तर त्याचे रूपांतर मानसिक आजारात होऊ शकते.
योग्य वेळी होमिओपॅथिक उपचार केले तर स्वतःचे व कुटुंबाचे भले होऊ शकते हेही सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे.
डॉ अजय हनमाने
एम. डी. (होमिओ) HHF, ICR Kolhapur,
चैतन्य होम्योपैथिक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4, Near HDFC Bank
शाहुपुरी व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
मोबाईल- 7738667123
रविवारी बंद  
कृपया पुढील लेख वाचा 
मानसिक समस्या आणि होमिओपॅथिक उपचार
—————————————————

An Unequal World – Homoeopathy on Mental Health and Mental Illness –

    October 10 is celebrated as World Mental Health Day by the World Federation of Mental Health. Every year, activities based on this concept are carried out throughout the year and work is done accordingly in all levels of the society.
There are still some fears, confusion, curiosity, doubts, many questions in everyone’s mind regarding mind and mental illness.
Even today in the 21st century we do not fully understand mental illness. We still often rely on hearsay or information from the internet or Google University.
Psychiatrists even today say that everyone’s eyebrows are raised and questions have a tone of doubt. What are you suggesting doctor for???
An excess of fear !!!
One morning when the corona was raging, a 25-year-old boy named Vijay came running and said, “Give me medicine immediately, otherwise I’m not real. I’ll probably die! I’m suffering a lot. I’m short of breath. Please do something.
A thorough physical examination of him did not reveal any signs of fear or illness. After pacifying him for some time and talking to him, it was realized that he was living alone due to his job. Due to travel restrictions, he could not go home or anyone could come from home to where he was staying. A person had died in his building a few days prior to the incident and no cause of death was found. There was talk in the building that his death was due to Corona. Vijay had spent a lot of time with the deceased the previous day. Vijay could not sleep all night as he was very afraid of Corona.
His mind starts thinking all night what will happen to me now ??As soon as morning came, he rushed to the hospital.
What happened to Vijay? Was ‘Vijay’ the only person with mental fear or did many sufferers go through this feeling?
Since December 2019, Corona has taken the whole world by storm and in the world till today, a different definition of survival has been born. “एकमेकांपासून दूर राहा. दो गज की दूरी, है जरुरी है |” This distance started to bother us.
People moved away from each other. Despite being very close, the importance and need of each other’s touch and emotionality was felt.
Due to the fear of Corona or the experience people went through, their minds became like a timid rabbit. They started to panic about everything for no reason. Some came out of this fear on their own but some did not. Had to seek medical help. Had to seek help repeatedly. Why? These discussions arose.
  • Why do you really need mental health treatment ?
  • What are mental illnesses ?
  • And what kind of mental illness was born due to Corona?
Now let’s look at another example
An IT professional named Namita visited the Clinic in a depressed mood. “How are you”? As soon as she asked this simple question, her anger was pouring out of her mouth like a volcano erupting. And how much should I do all by myself?
I used to cook, I used to look after the children, I did everything alone and I took care of my husband’s work ?
Her husband was not helping her in any work as he was not used to work. Her frustration was understandable but what was the solution? No one had thought of this.
Even today in the 21st century, in the Indian family system, be it joint or separate, the household chores are done by women. When will this mindset change?
Her husband said she was interested in working while Namita said he wanted an educated and employed wife.
The atmosphere of instability and uncertainty in all places of the world has been caused by that Corona. Those who can work from home have increased working hours and fever. Those who could not go to work had to lose their jobs or find new jobs (which might be lower paid). It created a kind of inequality.
One major common problem affecting all sections of society is the changing economic climate. Many family members lost their jobs, some had to lose their jobs, some had to quit their jobs due to the difficulty of traveling due to the closure of railway services. Working hours of some were extended and those hours were online longer to save jobs and others moved away. In some families, only the earner died due to Corona, so the whole family suffered.
The people who got Corona had a different situation.
Women have been hit hard by the epidemic along with the poor, elderly, disabled and immigrant populations. Gender disparity is increasing.
Dilip’s concern-
Dilip is a rickshaw driver  in the village. A routine worker every morning. Dilip was not getting up in the morning for the past few days. He did not want to do any work. Food and sleep never ran away. At first, the wife tried to take care of everything, but later she couldn’t handle the stress. So his wife brought him to my clinic for treatment.
After talking to Dileep, it was realized that there was no business in the early days of Corona due to traffic restrictions. And then due to the limited passenger number rule it adversely affected the revenue. Meanwhile, the price of petrol and diesel was increasing.
How to live in such a situation?
How to educate children online?
He did not understand the seriousness of his behavior. Due to the lack of answers to these burning questions, Dileep became more and more depressed and he was depressed due to lack of proper guidance and treatment.
A very bad situation has happened to those who working on daily wages. Due to all these things, it is natural to feel frustration, depression, anxiety, worry and depression in the mind.
When a person is happy, happy feelings always arise in his mind, but during periods of instability, such negative feelings always arise. It includes all people of the society, caste tribe, religion.
But men, women and children have also suffered due to this disease.
Children’s behavior has changed a lot. Fickleness, restlessness, irritability, shouting, expressing anger, increasing stubbornness, etc. are very different in nature.
The serious impact of the Covid 19 epidemic is clearly visible in the society.
Millions died and 120 million people were pushed into poverty. Global recession, suffering, poverty has increased. The impact of the epidemic on inequality is evident.
Inequality is a challenging concept that is difficult to define.
  • Inequality of what ?
  • Household income or GDP per capita?
  • Inequality in anyone ?
That person should be seen at the level of individuals. How has global income inequality changed during the pandemic?
Reading all the above examples, you may have realized that this is common. Should she immediately go to a psychiatrist because everyone goes through these feelings?
But one thing to be noted from all the above examples is that this feeling of fear arose in Vijay’s mind, if it is not removed at the right time then Vijay may fear everything. Fear can shake his confidence before doing any work and his personality can become timid.
If Namita’s anger is not vented at the right time and in the right manner, if she continues to get angry, the result will be her temper and she will lash out at everyone and destroy her sanity. If she continues to fume with anger, her body can have many side effects such as high blood pressure, heart disorders etc.
In the case of Dileep, if he gets too frustrated, he will not be able to work diligently in anything later. Constant negative thoughts will keep coming into his mind and that negativity will constantly show in his behavior and speech.
Unequal World –
Psychiatrists have a wide variety of experience in the field of mental health and homeopathy. Anxiety in patients with mental illness can transform depression into mental illness. In order to prevent it, it is necessary to seek immediate medical treatment if symptoms of mental illness appear.
Anxiety, fear, irritability, constant stress, depression, negative thoughts can all be symptoms of mental illness and if not recognized in time, it can turn into mental illness.
Everyone should also remember that Homoeopathic treatment at the right time can benefit oneself and the family.
Dr. Ajay Hanmane
M. D. (Hom) HHF, ICR Kolhapur,
Chaitanya Homoeopathic Clinic
Bhaskar Plaza- F4,Near HDFC Bank
Shahupuri Traders Peth
Near Railway Gate Bhaji Mandai
Kolhapur- 416001
Mobile- 7738667123
Sunday Closed 
Please Read Next Article
 Psychological problems and Homoeopathic treatment-