जागतिक मानसिक आरोग्य दिवस आणि होमिओपॅथी
सध्या जीवनशैलीतील बदलामुळे होमिओपॅथिक उपचार पद्धतीकडे रुग्णांचा कल वाढत चालला आहे. या उपचार पद्धतीत आजार मुळापासून बरा करण्याच्या प्रक्रियेवर भर दिला जातो.
व्यक्तीनिहाय परिपूर्ण अभ्यास –
होमिओपॅथिक उपचारांमध्ये मुळापासून रोग बरा करण्यावर भर दिला जातो. व्यक्तीनिहाय औषधे असतात.
सध्या जीवनशैलीतील बदलामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार असे विविध आजार जास्त प्रमाणात वाढत आहेत या आजारांसोबत व्यक्तीला मानसिक आजारही बळावत आहेत.
सामान्य घरातील एक दिवस—
समीनचे सकाळीच रडगाणे सुरू झाले, मला शाळेत जायचे नाही. आईने त्याला नेहमीप्रमाणे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण आज समीन काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. आईचा आवाज बदलला आणि रागाचा पारा वाढल्याचे पाहिल्यावर आजी-आजोबांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण तो व्यर्थ गेला आणि वातावरण भलतेच तापले. रागाच्या भरात समीनला आईने जवळजवळ खेचूनच शाळेत नेले आणि ती ही तशीच रागातच तिच्या ऑफिसला गेली. सलील दिवसभर शाळेत रुसून बसला. त्याचे अभ्यासात जराही लक्ष लागत नव्हते. आईही ऑफिसमध्ये दिवसभर डोके दुखते म्हणून कामाच्या ठिकाणी जरा ताणतणावातच काम करत राहिली. संध्याकाळी बाबांना समजल्यावर ते जरा जास्तच उदास झाले. हल्ली घरामध्ये वारंवार या घटना घडायला लागल्या याची जाणीव त्यांना जरा जास्तच झाली. हताशपणे ते स्वस्थ बसून राहिले.
वरील घटना थोड्याफार फरकाने प्रत्येक घरात कधी ना कधी अनुभवली असेलच.
समस्या काय आणि का ?
जरा या घरातील व्यक्ती आणि सकाळी घटनेत घडलेल्या घटनेला जर वेगळ्या तऱ्हेने पाहु या !
समीनने जवळजवळ दोन वर्षांनी शाळेत जायला सुरुवात केली होती. लॅपटॉप आणि मोबाईल मधल्या शाळेत लिखाण काम कमी होतं आणि आता त्याला शाळेत सलग बसणे आणि लिहिणे कठीण वाटत होतं. त्याची चिडचिड होत होती आणि म्हणून त्याला शाळेबद्दल कंटाळा यायला लागला होता.
आईने कोरोना काळात बऱ्याच प्रमाणात वेगवेगळे ताण सहन केले होते. त्यामुळे विशिष्ट गोष्टीचा ताण तिला जराही सहन होत नव्हता. त्याच्यातच बाहेरील जगातील वाढली स्पर्धा तिला जरा ही स्वस्त बसू देत नव्हती. त्यामुळे तिचे शरीर आता पटकन तणावात काहीतरी परिणाम दाखवत असे.
बाबा तर वेगळ्याच मनःस्थितीतून जात होते. कामाचे वाढलेले तास,नोकरीची अनिश्चितता,वाढणारे वय, वाढणारी स्पर्धा आणिश त्यात कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही ही खंत या अशाच बऱ्याच भावनांचा कल्लोळ त्यांच्या मनात उठला होता.
समीनची अभ्यासातील झालेली परवड, आईची होणारी चिडचिड आणि बाबांना वाटणारी खंत,आणखीन विश्लेषण जर या घटनेचे केले तर तुम्हाला असे लक्षात येईल कुठेतरी या कुटुंबातील संवाद, समतोल बिघडलेला आहे.
तणावाची कारणे काय ? —
वरवर पाहिल्यास या कृतीतून असे दिसून येते की या कुटुंबातील प्रत्येक जण तणावातून जात आहे. असा प्रत्येकाचा तणाव वेगळा आहे तशी त्यांची कृती वेगळी आहे.
जसा समीन शाळेत जाणारा मुलगा आहे त्याच्या तणावाचे केंद्र हे अभ्यासा भोवती आहे.
आईचे तणावाचे केंद्र समीनची अभ्यासातील प्रगती आणि भविष्य यासाठी आहे.
बाबा मात्र कुटुंब प्रमुख असल्यामुळे त्यांच्यावर संपूर्ण घराची जबाबदारी, आर्थिक स्थैर्य आणि कुटुंबाचे रक्षण करण्याकडे आहे. यावरून असे लक्षात आले असेल की तणाव आपल्या बाजूला असतोच आणि प्रत्येकावर असतो, तो फक्त आपल्याला दिसत नसतो, जाणवत नसतो.
आपल्याला दिसते जाणवते ती म्हणजे चिडचिड, भीती, चिंता, छातीत होणारी धडधड, हातापायांना सुटणारा कंप, डोकेदुखी आणि बरेच काही.
बऱ्याच वेळेला ताणाची तीव्रता ही लक्षणांची तीव्रता ठरवते. जितका ताणाचे स्वरूप जास्त तेवढी लक्षणे जास्त दिसतात. बहुतांशी अशी लक्षणे ही व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वावर अवलंबून असतात. त्याचा स्वभाव, आजूबाजूला असलेली परिस्थिती, त्या व्यक्तीचा इतरांशी असलेल्या संवाद, त्यांची व्यक्त होण्याची प्रवृत्ती आणि शरीरावर होणारा परिणाम यावर अवलंबून असते.
तणावाने सर्वांचे मानसिक स्वास्थ्य बिघडून टाकले आहे.
बऱ्याच वेळेला आपण हे लक्षातच घेत नाही की आपले मानसिक आरोग्य आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहे. आपले सर्व लक्ष आपण आपल्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी जेवढे देतो,तेवढे आपले लक्ष आपल्या मानसिक आरोग्यासाठी देतो का ?
हा प्रश्न आज तुम्हाला स्वतःलाच विचारावं लागेल आणि त्याचे उत्तर ‘नाहीच‘ असेल अशी मला खात्री आहे.
किती व्यापक आहे ही समस्या आणि का ?
कोरोनाच्या काळात प्रत्येकी आठ ते दहा व्यक्तींच्या मध्ये एका व्यक्तीला मानसिक आधाराची उपचाराची गरज असे. कोरोना नंतरच्या काळात हे प्रमाण वाढतच गेले आणि आधार देणाऱ्यांची आणि उपचार देणाऱ्यांची संख्या कमी होत गेली. आज ही मानसिक आजार म्हटल्यावर बऱ्याच जणांचे भुवया वर जातात आणि चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटते. मानसिक आजारांकडे एक ‘कलंक’ म्हणून पाहिले जाते.
मानसिक आजार हे उपचाराने ठीक होऊ शकतात हे ही माहीत असूनही त्यांना योग्य ती उपचार पद्धती दिली जात नाही किंवा त्यामध्ये चालढकल केली जाते.
सामाजिक,आर्थिक अस्थिरता ही सर्वात जास्त ताण निर्माण करणारी आहे त्याचबरोबर येणारे ताण जास्त काळासाठी मनामध्ये निर्माण करतात आणि त्याचा परिणाम वेगवेगळ्या तऱ्हेने शरीरांवर दिसून येतो.
शरीर आणि मन हे एकमेकांशी एवढे एकनिष्ठ आहेत की, जर हे शरीरात कुठे ताण निर्माण झाला की एकमेकांवर त्यांचे परिणाम दिसतात. जसे अतिश्रमामुळे मन उदास निस्तेज होऊन कामाच्या उत्पादन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो किंवा चिडचिड,अतिविचार, चिंता यामुळे देखील शरीराच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.
निवृत्तीनंतर किंवा वय झाल्यामुळे देखील मानसिक आजार उद्भवतात.
रिकामेपणा, एकटेपणा, जोडीदाराचे अकाली निघून जाणे अथवा वेगवेगळ्या व्याधींमुळे शरीर साथ न देणे यामुळे म्हातारपणी देखील मानसिक आजाराच्या समस्या जाणवू शकतात.
एकंदरीत पाहता, मानसिक आजारांना वय, लिंग, जाती जमाती, श्रीमंत, गरीब, हुशार, मठ्ठ किंवा ठराविकता ही कधीच नसते. मानसिक आजार हे कोणालाही कधीही, केव्हाही, कुठेही, होऊ शकतो. फक्त गरज आहे ते त्यांची लक्षणे ओळखण्याची आणि योग्य ते होमिओपॅथीक उपचार करण्याचे.
संकल्पने मागची पार्श्वभूमी ––
गेली दोन वर्षे कोरोनाच्या साथीमुळे उद्योगधंद्याची गती पूर्णपणे थांबलीच होती.
कोरोना लाटेमुळे ठप्प झालेले जनजीवन दुनियेला खूपच मागे घेऊन गेले. लॉकडाऊन, धंदे बंद, शाळा बंद, नोकरी व्यवसाय बंद. सुरुवातीला सक्तीचा आराम आवडला. पण जेव्हा आर्थिक चणचण वाढली, नोकरीवाल्यांचे तर वेगळेच दुखणे होते, कामाच्या ठिकाणी वेगळेच वातावरण होते, नोकरी आणि पगाराची शाश्वती नव्हती कामाच्या वेळा वाढलेल्या पण सतत अनिश्चितता, खूप काही जखमा करून गेल्या.
जशी या आरामाची नशा उतरायला लागली तशी झोप कमी झाली, चिंता काळजी, हुरहुर वाढू लागली. तशातच कुटुंबातील व्यक्ती जास्त वेळ एकामेकांच्या सानिध्यात राहिल्यामुळे इतरांमधील उनिवा, कमतरता जास्त दिसून यायला लागल्या. तणाव वाढला जाऊन नात्या नात्यांमध्ये जरा जास्तच कडवटपणा यायला लागला. शारीरिक आणि मानसिक त्रास जाणवायला लागला. त्यातच कोरोनाची भीती जरा जास्त ताण देऊन गेली.
शारीरिक दुखण्यांवर औषधोपचार वेळीच केले गेले, पण मनाच्या दुखण्याचे काय?
जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांमुळे आर्थिक चक्र तर सुरू झाले पण रोजगारावर जाणाऱ्यांना मात्र रोजगार मिळत नव्हता. तरुण वर्ग काहीतरी करू शकत होता, पण मुले, वयोवृत्त यांना बघणारे कोणीच नाही अशा या सर्व व्यक्तींबद्दल तर खूपच निराशाजनक वातावरण होते. या सर्व गोष्टींचा मनावर खूपच परिणाम झाला आणि मानसिक स्वास्थ्य जरा जास्तच विस्कळीत झाले.
आर्थिक दरी, दोन गटांमध्ये,समाजामध्ये वाढू लागली, ही विषमता नक्कीच काही काळ तरी अशीच राहणार आहे. पण तोपर्यंत मानसिक स्वास्थ्याचे काय ?
मानसिक आरोग्य ही काळाची गरज—
मानसिक आरोग्य ही काळाची गरज नेहमीच राहिलेली आहे. पण त्याकडे जेवढे लक्ष द्यायला हवे तेवढे दिले जात नाही. या जगात अस्थिरता विषमता आणि ताणतणाव ही राहणारच आहेत,मग मनाची आणि ह्या शारीरिक मानसिक स्वास्थ्याची काळजी कशी घेता येईल ? याबाबत खूपच गांभीर्याने विचार केला पाहिजे.
वरील उदाहरणावरून लक्षात आले असेलच की ताणतणाव हा कुठल्याही वयात येऊ शकतो आणि वेळीच ही लक्षणे समजून नाही घेतली तर त्यांचे रूपांतर मानसिक आजारात होऊ शकते.
हे सर्व टाळण्यासाठी शालेय कॉलेज कामाच्या ठिकाणी मानसिक तणाव कमी करण्याच्या दृष्टीने मुख्य प्रयत्न करायला हवे. मानसिक आजारांचे स्वरूप शालेय स्तरावर अभ्यासाच्या येणाऱ्या अडचणी या नेमक्या कशा प्रकारच्या आणि काय आहेत हे समजून घेऊन त्या रूपायोजन करायला हवी. जसे शालेय जीवनात अतिचंचलता, गतीमंदता, मतिमंदता, स्वमग्नता या लहान मुलांमध्ये प्रामुख्याने दिसणाऱ्या मानसिक आजारांचे स्वरूप वेळीच ओळखून त्याची उपायोजना केली पाहिजे.
कॉलेजच्या स्तरावर अभ्यासाच्या ताणा बरोबरच व्यक्तिमत्त्वाची संबंधित तणाव जास्त प्रमाणात दिसतात. जसे जास्त हुशार किंवा उगाचच बेफिकरता दाखवणे आणि त्या अनुषंगाने येणारे तणाव त्याचवेळी शारीरिक बदलांमुळे होणारे आणि वाटणारे आकर्षण यांचे महत्त्व वाढून त्यातून होणारे संघर्ष हे वेळीच नाही ओळखले तर त्यामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडून आजार वाढू शकतात.
कामाच्या ठिकाणी सतत चढाओढ,सतत दुसऱ्या पुढे जाण्याची अहंमिका आणि त्यातून निर्माण होणारी उदवेगाची भावना ही कुठल्याही वयात निर्माण होऊन त्याचा शरीरावर बदल होऊ शकतो.
मानसिक स्वास्थ्य टिकून राहावे यासाठी समाजात स्वास्थ्यबद्दल शारीरिक मानसिक स्वास्थ्याबद्दल जागृती, वेगवेगळे आजार त्यांची कारणे, व्यक्तींवर होणारे दुष्परिणाम यांची माहिती समाजाला असेल तर तंदुरुस्ती कायम राहते.
कोविडच्या दरम्यान आणि नंतरच्या काळात हे वारंवार दिसून आले आहे की, समाजाच्या साथीचेच ह्या स्वास्थ्याला आत्मसात करता येईल व होमिओपॅथिक औषध उपचार पद्धतीनेच स्वास्थ्य सुधारू शकते आणि समाजाचे आणि पर्यायाने देशाचे स्वास्थ्य सुधारू शकते.
या लेखाच्या माध्यमातून समाजमन जागृत करण्यामागचे हे प्रयोजन.
डॉ अजय हनमाने
एम. डी. (होमिओ) HHF,ICR Kolhapur,
चैतन्य होम्योपैथिक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4
शाहुपुरी व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
मोबाईल- 7738667123
रविवारी बंद
कृपया पुढील लेख वाचा —
Currently, patients are increasingly turning to Homoeopathic treatment due to lifestyle changes. In this method of treatment, emphasis is placed on the process of curing the disease from the root.
Individualized thorough study
Homeopathic treatment focuses on treating the disease from the root. Medicines are individualized.
Currently, various diseases like high blood pressure, diabetes, heart disease are increasing due to lifestyle changes, along with these diseases, mental diseases are also increasing.
A day in a normal household–
Sameen started crying in the morning, I don’t want to go to school. Mother tried to explain him as usual. But today Sameen was in no mood to listen. The grandparents tried to mediate when they saw the mother’s voice change and her temper rise. But it went in vain and the atmosphere heated up. In anger, Sameen was almost dragged to school by her mother and she went to her office in the same anger. Salil sat sulking in school all day. He did not pay any attention to his studies. Mother also continued to work under a little stress at work as she had a headache all day in the office. When Baba came to know in the evening, he became a little more depressed. Recently, they became more aware that these incidents started happening frequently in the house. Desperately they sat still.
Every household must have experienced the above incident with a slight difference. What would be special in this event? What happened to the person in this family? To what extent all these simple incidents have affected the individuals in this family? Will their health be good physically and mentally?
What is the problem and why?
Let’s look at the person in this house and the incident that happened in the morning in a different way!
Sameen started going to school almost two years later. Between laptops and mobiles, writing at school was less and he now found it difficult to sit and write continuously in school. He was getting irritable and hence he started getting bored about school. Mother had endured a lot of stress during Corona. So she could not bear the stress of a particular thing. The increased competition in the outside world did not allow her to sit this cheap. So her body now quickly showed some kind of reaction to stress.
Baba was going through a different state of mind. There were many feelings in his mind like increased working hours, uncertainty of job, increasing age, increasing competition and regret of not being able to give time to family.
Sameen’s failure in studies, mother’s irritation and father’s regret, if you analyze this incident further, you will notice that somewhere the communication, balance in this family is disturbed.
What Causes Stress —
On the surface, this action shows that everyone in this family is going through stress. As everyone’s stress is different, their actions are different.
As a school-going boy, Sameen’s stress centers around studies.
Mother’s stress centers on Sameen’s academic progress and future.
But since father is the head of the family, he is responsible for the entire household, financial stability and protection of the family. From this it must have been realized that stress is on our side and on everyone, it is not only seen, not felt by us. What we see and feel is irritability, fear, anxiety, palpitations, tremors, headaches and more.
Often the severity of the stress determines the severity of the symptoms. The more severe the stress, the more severe the symptoms. Most of these symptoms depend on the individual’s personality. It depends on the nature, the surrounding situation, the person’s interactions with others, their tendency to express and the effect on the body.
Stress has taken a toll on everyone’s mental health.
Many times we don’t realize how important our mental health is to us. Do we give as much attention to our mental health as we do to our physical fitness? This is the question you have to ask yourself today and I am sure the answer is ‘no’.
How widespread is this problem and why?
During the Corona period, one person in every eight to ten people needed mental support treatment. In the post-corona period, this number has continued to increase and the number of people providing support and treatment has been decreasing. Today, when it is said that mental illness, many people raise their eyebrows and a question mark appears on their face. Mental illness is seen as a ‘stigma’. Mental illnesses are often undertreated or undertreated despite the knowledge that they can be cured with treatment.
Social and economic instability is the biggest stressor, and the resulting stress builds up in the mind for a long period of time and its effect is seen on the body in different ways.
The body and the mind are so closely related that if there is tension anywhere in the body, the effects on each other are felt. Just as overwork can make the mind depressed and affect the productivity of work, or irritability,
overthinking, anxiety can also affect the body’s capacity.
Mental illness also occurs after retirement or aging.
Due to emptiness, loneliness, untimely departure of spouse or body not supporting due to various diseases, mental illness problems can also be experienced in old age.
Overall, mental illness has no age, gender, caste, rich, poor, intelligent, fat or typical. Mental illness can happen to anyone, anytime, anywhere. All that is required is to recognize their symptoms and treat them appropriately with homeopathy.
10th October is celebrated worldwide as World Mental Health Day. The slogan in 2022 – mental health for all, well-being for the world
is the backdrop behind the resolution —
the last two years the industry had come to a complete standstill due to the Corona pandemic.
Due to the corona wave, life has taken the world back a lot. Lockdown, businesses closed, schools closed, jobs closed. At first I liked the forced relief, but when the financial turmoil increased, the employees had different pains, different work environment, job and salary were not guaranteed, increased working hours but constant uncertainty, many injuries were caused.
As the intoxication of this comfort began to wear off, sleep decreased, anxiety and worry increased. In the same way, as the members of the family stayed in close proximity to each other for a longer time, the weaknesses and shortcomings of others began to appear more. The tension increased and the relationship became a little more bitter. Physical and mental suffering began to be felt. In that, the fear of Corona gave a little more stress. Physical pain was treated in time, but what about mental pain?
The economic cycle started due to the shops of essential goods but those who went for employment were not getting employment. The youth could do something, but there was no one to look after the children, the elderly, and all these people had a very depressing atmosphere. All these things took a toll on the mind and mental health became a little more disturbed. The economic gap, between the two groups, started to widen in the society, this disparity is sure to remain so for some time. But until then, what about mental health?
Mental health is the need of the hour– Mental health has always been the need of the hour. But it is not given as much attention as it should be. In this world there will be instability, disparity and stress, so how can we take care of the mind and this physical and mental health? This should be considered very seriously.
From the above example, it must have been realized that stress can occur at any age and if these symptoms are not understood in time, they can turn into mental illness.
To avoid all this, school colleges should make major efforts to reduce mental stress in the workplace. The nature of mental illnesses should be designed by understanding the type and nature of study difficulties at the school level. Just like in school life, hyperactivity, slowness of movement, mental retardation, self-absorbed nature of mental diseases mainly seen in children should be identified and remedied in time.
At the college level, along with academic stress, personality related stress is more prevalent. Such as being too smart or too carefree and the stress that comes with it, while at the same time the importance of physical changes and feelings of attraction and the conflicts that arise from them, if not recognized in time, can lead to deterioration of mental health and illness.
Constant struggle at work place, egoism of constantly getting ahead of others and the feeling of tension arising from it can be formed at any age and it can change the body.
In order to maintain mental health, if the society has awareness about health, physical and mental health, different diseases, their causes, and side effects on individuals, then health will remain.
During and after covid it has been shown time and time again that society can absorb this health and homeopathic medicine can only improve health and improve the health of the society and in turn the country.
Chaitanya Homeopathic Clinic has been trying to provide homeopathic services in this segment for the past 22 years. Homeopathic treatment is beneficial for many mental illnesses.
The purpose of awakening the social mind through this article.
Dr. Ajay Hanmane
M. D. (Homeo)
Chaitanya Homeopathic Clinic
Bhaskar Plaza- F4
Shahupuri Traders Peth
Railway Gate Near Bhaji Mandai
Kolhapur- 416001
Mobile- 7738667123
Sunday Closed
Please Read Next Article–