होमिओपॅथिक प्रतिबंधक उपचार / Homoeopathic Preventive Treatment

Dorctor Pic By Dr. Ajay HanmaneJune 12, 2023 Homeopathic and Cure Uncategorized

होमिओपॅथिक प्रतिबंधक उपचार


     होमिओपॅथी विविध आजारांवर कशी उपयुक्त आहे हे आपण अनेक मागील लेखांमध्ये पाहिले आहे. आता मुद्दा आहे तो असा की, आजार उद्भवूच नये यासाठी होमिओपॅथी मध्ये काही प्रतिबंधक उपाय असतात का?
मुळात प्रतिबंध- Prevention  ही संकल्पना तरी होमिओपॅथिक आहे काय ?
याचे उत्तर “होय”  असं आहे.
ही संकल्पना होमिओपॅथिक डॉक्टर सतत राबवीतही असतात. एवढंच नव्हे तर या संदर्भात पारंपारिक प्रतिबंधतेच्या कल्पनेपेक्षा होमिओपॅथी ही एक पाऊल पुढेच असते.
  होमिओपॅथीतील प्रतिबंधक उपाय हे चार पातळीवरचे असतात–
1.रोगाच्या मूळ उद्भवाला प्रतिबंध
2.रोगाच्या पुनःउदभवाला  प्रतिबंध
3. गुंतागुंतीला प्रतिबंध
4. लसीकरणाच्या दुष्परिणावर परिणामावर

प्रचलित प्रतिबंधक उपायाची संकल्पना मुख्यतः सार्वत्रिक लसीकरण व सार्वजनिक स्वच्छता एवढ्या पुरतीच मर्यादित आहे. दोन्ही बाबतीत अनेक त्रुटी आहेतच.भारतासारख्या विकसनशील देशात तर विचारायलाच नको, कारण कॅन्सर आणि टीबी सारख्या आजारांचे प्रमाण लक्षणीय वाढलेले आहे.

सार्वत्रिक लसीकरणासाठी शासकीय पातळीवर नेटाने प्रयत्न केले जातात.

लसीकरणांमध्ये शरीरात शक्तीहीन जंतूंची लस टोचली जाते व त्या जंतूंच्या प्रादुर्भावाला शरीराच्या प्रतिकारक शक्तीकडून प्रतिबंध करण्याची अपेक्षा केली जाते. या पद्धतीने रोग-जंतूंची प्रतिकार करण्यासाठी शरीराची अगोदरच तयार केली जाते.

यात  हा  प्रश्न येतो  की, त्या व्यक्तीमध्ये लशीतून  टोचल्या जाणाऱ्या जंतूशी मुकाबला करण्यात की प्रतिकारक्षमता आहे की नाही?

कुठल्याही इन्फेक्शनचे कारण हे मुळात त्या व्यक्तीची प्रतिकारक्षमता क्षीण झालेली असणं हेच असतं.

तेंव्हा ज्याची प्रतिकारक्षमता कमकुवत असते तो जंतूच्या प्रादुर्भावाला बळी पडतो. दुर्दैवाची गोष्ट अशी की, अशा बिघडलेल्या प्रतिकार क्षमतेला “दुरुस्त” करणारे कुठलेही औषधोपचार आधुनिक वैद्यक शास्त्रात नाहीत.

जागतिक आरोग्य संघटनेने लसीकरणाचे दुष्परिणाम म्हणून नोंद केलेल्या आजारांची संख्या ही लक्षणीय आहे.

प्रतिकारशक्तीला योग्य दिशेने सक्षम (उत्तेजित) करणे आणि कुठल्याही जंतू प्रादुर्भावाचे वेळी योग्य प्रमाणात प्रतिक्रिया दिली जाईल असे पाहणे हे होमिओपॅथीतील रोगप्रतिबंधाचे  तत्त्व आहे–  हे तत्व पाळणारी, आचरणात आणणारी  होमिओपॅथी ही एकमेव पॅथी आहे.

होमिओपॅथी मध्ये रोगापेक्षा रुग्णावर उपचार केले जातात, हे खरे आहे. तथापि कुठल्याही समाजात तेथील सर्वसाधारण परिस्थितीमुळे उद्भवणारे काही आजार असतातच. अशावेळी आजाराचे कारण सर्वांसाठी तेच असते.

व्यक्तीच्या प्रतिकारक क्षमतेमुळे तीव्रता कमी जास्त होत असली तरी सर्वसाधारण लक्षणे सर्वांमध्ये सारखीच असतात. अशा परिस्थितीत सर्वांसाठी एक समान उपचार सुचवला जाऊ शकतो ज्याला साथीच्या रोगावरचे औषध म्हणता येईल अर्थात जीनस इपिडमिकस (Genous Epidemicus).

ज्यांना साथीचा रोग झालेला असेल त्यांना ते औषध रोगमुक्त करेल तर इतरांमध्ये रोगाला प्रतिबंध करेल. जीनस इपिडमिकस मध्ये प्रतिकारक्षमतेला योग्य दिशेने व योग्य प्रमाणात चालना दिली जात असल्याने वर उल्लेख केलेले लसीकरणाचे दुष्परिणाम टाळले जातात. शिवाय जागतिक आरोग्य संघटनेने या अनुषंगाने नोंद केलेल्या आजारांवरही उपचार होतात.

थोडक्यात काय होमिओपॅथीचे प्रतिबंध खूप छान हे सर्वोत्तम व सुरक्षित असतात. आजार कुठलाही असला- रोगाचे नाव कुठलेही असले- तरी होमिओपॅथी रुग्णाची प्रतिकारक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने उपचार करीत असल्याने — होमिओपॅथीक उपचार घेत असणाऱ्या व्यक्तींमध्ये—- इतरांच्या तुलनेत साथीच्या  रोगांचा प्रादुर्भाव अत्यंत कमी आढळत़ो — किंबहुना ते प्रमाण नगन्यच असते.

हा निव्वळ योगायोग नक्कीच नव्हे. कुठल्याही होमिओपॅथिक डॉक्टरच्या रेकॉर्डवरून हे सिद्ध होऊ शकते.

प्रचलित वैद्यक शास्त्रात /आधुनिक वैद्यक शास्त्रात रोगाची बाह्य लक्षणे दडपली जातात.,व त्यातून पुढे मोठे आजार उद्भवू शकतात.

होमिओपॅथीचे उपचार मुळावरच उपाय करीत असल्याने पुढे उदभवू शकणाऱ्या मोठ्या आजारांना साहजिकच प्रतिबंध केला जातो.

डॉ.अजय हनमाने
M.D. (Hom), HHF, ICR Kolhapur,
 चैतन्य क्लिनिक
पहिला मजला, F4,
भास्कर प्लाझा, व्यापारी पेठ,
पाच बंगला भाजी मंडई जवळ
कोल्हापूर, 416001
Mobile No. 7738667123
रविवारी बंद
कृपया पुढील लेख वाचा 
होमिओपॅथी विषयी थोडेसे – भाग एक
———————————————————–
Homoeopathic Preventive treatment
We have seen in many previous articles how Homoeopathy is useful for various ailments. Now the point is, does  Homoeopathy  have any preventative measures to prevent disease from occurring?
Is the concept of prevention Homoeopathic?
The answer is “yes”.
This concept is continuously implemented by Homoeopathic Doctors. Not only this, but in this respect Homoeopathy is a step ahead of the conventional idea of prevention.
Preventive measures in Homeopathy are of four levels–
1. Prevention of the root cause of the disease
2. Prevention of recurrence of disease
3. Prevention of complications
4. On the effect on adverse effects of vaccination
The concept of preventive measures in practice is mainly limited to universal vaccination and public sanitation. There are many errors in both cases.
Not to mention in a developing country like India, because the incidence of diseases like cancer and TB has increased significantly.
Concerted efforts are being made at the Government level for Universal Vaccination. Vaccinations involve the injection of weakened germs into the body and the body’s Immune system is expected to prevent exposure to those germs.
In this way, the body is prepared in advance to resist the pathogens. This raises the question of whether or not the person has immunity to fight the germs that are being injected into the vaccine.
The reason for any infection is that the person’s immunity is weakened.
Then the person whose immunity is weak becomes susceptible to germs.
Unfortunately, there are no drugs in modern medicine that can “correct” such impaired immunity.
The number of diseases reported by the World Health Organization as side effects of vaccination is significant.
To enable (stimulate) the immune system in the right direction and to see that it reacts appropriately to any germs is the  Homoeopathy is the only path that practices this principle.
It is true that  Homoeopathy  treats the patient rather than the disease.
However, in any society there are some diseases that arise due to the general conditions there. In that case the cause of the disease is the same for all.
    Although the severity varies depending on the individual’s immune system, the general symptoms are the same in all. In such a situation, a common treatment for all can be suggested which can be called the medicine of epidemic disease i.e. Genus Epidemicus. 
The drug will cure those who are infected with the disease and prevent the disease in others. As immunity is stimulated in the right direction and in the right amount in the Genus Epidemicus, the side effects of vaccination mentioned above are avoided.
Apart from this, the diseases registered by the World Health Organization are also treated.
In short, Homoeopathic remedies are very good, best and safe. No matter what the disease is – no matter what the name of the disease is – because Homoeopathy  treats the patient with a view to increasing the immunity of the patient, the incidence of epidemics is very low in people who receive Homoeopathic treatment, in fact it is negligible.
This is definitely not a coincidence. This can be proved from the records of any Homoeopathic doctor.
In conventional medicine / modern medicine, the external symptoms of the disease are suppressed, and from this, major diseases can arise.
Since Homoeopathic treatment treats the root itself, major diseases that may arise later are naturally prevented.

Dr Ajay Hanmane
M.D.(Homeo)HHF,ICR Kolhapur,
Chaitanya Homoeopathic Clinic
1st Floor, F4,
Bhaskar Plaza Vyapari Peth,
Near Panch Bunglow Bhaji Mandai
Kolhapur, 416001
Mobile No. 7738667123
Sunday Closed

Please Read Next Article
A Little About Homeopathy – Part One