स्त्रियांचे आजार आणि होमिओपॅथी / Women’s Diseases and Homoeopathy
By Dr. Ajay Hanmane
June 5, 2023 Female Problems Uncategorized
स्त्रियांचे आजार आणि होमिओपॅथी—
स्त्रियांच्या आयुष्यात आणि आरोग्यात हार्मोन्स / संप्रेरके यांचं फार महत्त्वाचं योगदान असतं. स्त्री जीवनाचे जे काही विविध टप्पे असतात म्हणजे बालपण, वयात येणे ( Menarche),प्रजोत्पादन (Fertility) ,रजोनिवृत्ती / मेनोपॉज (Menopause) या प्रत्येक टप्प्यावर स्त्रीमध्ये शारीरिक आणि मानसिक बदल घडत असतात. हे सर्वच बदल सहज होतात असे नाही. त्यामुळे या बदलांना सामोरे जाणं, त्यांच्याशी जुळवून घेणं ही प्रत्येक स्त्रीसाठी एक कसोटीच असते.
संप्रेरकांचं म्हणजेच हार्मोन्स (Harmons) संतुलन बिघडलं की, स्त्रीचं आरोग्य बिघडतं. मासिक पाळी सुरू होण्याच्या आधी पाच ते सहा दिवस अनेक स्त्रियांमध्ये, निरुत्साह, डोकेदुखी, थकवा अशा तक्रारी सुरू होतात. चेहऱ्यावर पुटकुळ्या येणे, पायाला सूज येणे, पोट बिघडणं, स्थूलता वाढणं या लक्षणांबरोबरच चिडचिड करणं, उदास होणं हेही आढळून येतं याला प्री-मेन्सट्र्युअल सिम्प्टम्स (Pre-Menstrual symptoms)म्हणतात.
प्रत्येक पाळीच्या दिवसात विशेषतः पहिल्या दिवशी ओटी पोटात दुखणं (Dysmenorrhea) ही एक सर्वसाधारण तक्रार असते. अर्थात काही स्त्रियांना हे सोसण्याइतपत असतं तर काहींना प्रचंड वेदना होतात.
मासिक पाळी असं म्हटलं जातं कारण साधारणतः प्रत्येक 28 दिवसानंतर पाळी / पिरेड सुरू होतात. पण अनेक स्त्रियांमध्ये हा कालावधी 21 ते 35 दिवसांपर्यंत असतो. साधारण चार ते सात दिवस पुढे मागे चालते. तरुण मुलींमध्ये 21 दिवस ते 45 दिवस असाही कालावधी असतो.
शक्यतो, मासिक पाळी न येणे, अनियमित होणे, रक्तस्त्राव कमी अथवा जास्त होणे, गाठी जाणे अशा अनेक तक्रारी असतात. प्रत्येक महिन्याला स्त्रीच्या शरीरातील संप्रेरकांची / हार्मोन्सची पातळी कमी- अधिक होत असते. थायरॉईड डिसफंक्शन – Dysfunction- थायरॉईड ग्रंथीचे कार्य बिघडणे हे एक संप्रेरकाचं समतोल बिघडण्याचे कारण असतं. याखेरीज डी.यु.बी. (DUB) पीसीओडी (PCOD) यांचाही प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे.
आजच्या धकाधकीच्या काळात संप्रेरकांचं संतुलन साधल जात नाही याचं एक हे लक्षण आहे.
डी यू बी (DUB) म्हणजे डीसफंक्शनल युटेराइंन ब्लीडिंग – बीजकोशातून स्त्रीबीज न स्त्रवल्याने सामान्यतः हा त्रास होतो. रक्तस्त्राव अती होत राहिल्याने अनेक तक्रार उद्भवतात.
पीसीओडी (PCOD) म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज – स्त्रीबीजकोशात CYST /पाण्याच्या गाठी तयार होऊन त्या स्त्रीबीज परिपक्व होण्याला व उत्सर्जित करण्याला अडथळा निर्माण करतात. त्यामुळे ओव्हूलेशन होत नाही व संप्रेरकांचा समतोल बिघडून अनेक लक्षणे दिसू लागतात. पाळी न येणे, वजन वाढणे, चेहऱ्यावर फोड व केस येणे, केस पातळ होणे दिवस न राहणं- गरोदर न होणे इत्यादी.
सोनोग्राफीने पीसीओडीचे निदान करता येतं. प्रत्येक स्त्रीमध्ये वरील सर्वच लक्षण असतात असं मात्र नाही, कारण किशोरवयीन व तरुण मुलींमध्ये हा सर्वसाधारण आजार झाला आहे. त्यावेळी बाह्य लक्षणांवरून तो व्यक्ती विविध तज्ञांकडे उपचार घेत राहतो पण त्यामुळे लक्षण फक्त दबली जातात व अंतर्गत आजार बळावत जातो.
अंगावरून पांढरे जाणं ( Leucorrhoea)ही एक साधारण तक्रार असते. योनीमार्गामध्ये जंतू संसर्ग होतो तेव्हा हाच स्त्राव वाढतो. त्यातून अनेक आजार उद्भवू शकतात. पांढरे जाणं याबरोबरच इतर कोणती लक्षणे आहेत यावरून रोगाचे निदान केलं जातं.
याशिवाय गर्भधारणेनंतर साधारणतः तीन- साडेतीन महिन्यांपर्यंत मळमळने व उलटी होणे ही सर्वाधिक आढळणारी तक्रार असते.
स्त्रीच्या आयुष्यातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे रजोनिवृत्ती किंवा मेनोपॉज. पाळी बंद होताना अनेक स्त्रियांमध्ये चेहरा अचानक गरम होणे, कान गरम होणे, घाम फुडणे, हृदयात धडधड होणे व अकारण रडणे, चिडचिड होणे अशी लक्षणे दिसतात. काहींची झोप उडते तर काहींना डोकेदुखी व कानात आवाज येण्याचा त्रास होतो. काहीच ब्लडप्रेशर वाढते. काहींची मानसिकता बिघडते,त्यातून भीती निर्माण होते. अशा सर्व तक्रारींसाठी होमिओपॅथी मध्ये अत्यंत परिणामकारक व सुरक्षित औषध उपलब्ध आहेत.
तरुण मुलींच्या दृष्टीने तारुण्यातील पदार्पण हा शारीरिक-मानसिक- भावनिक दृष्ट्या फार महत्त्वाचा टप्पा असतो. या वयात हसत खेळत आयुष्य खूप एन्जॉय करणाऱ्या मुली आपण बघत असतो. होमिओपॅथिक औषधांमुळे स्त्रियांमधील हार्मोनल असंतुलन संतुलित केले जाते. त्यामुळे स्वभावात बदल होतो, चिडणे कमी होऊन मन शांत होतं, अस्वस्थता कमी होते, केस गळणे, चेहऱ्यावरील मुरमांची (Pimples) संख्या कमी होणे असे सकारात्मक बदल दिसू लागतात. म्हणजे वयात येणाऱ्या मुलींसाठी होमिओपॅथी ही एक जीवाभावाची सखी ठरू शकते.
डी यु बी (DUB)- Dysfunctional Uterine Bleeding या केस मध्ये मॉडर्न उपचार पद्धती ब्लीडिंग तात्पुरते थांबवू शकते.
पण डिसफंक्शन (Dis-function) शोधू शकत नाही. सोनोग्राफीमध्ये ते दिसू शकत नाही. कारण तो हार्मोनल असमतोल असतो. अर्थात यावर हार्मोनल पिल्स दिल्या जातात. पण त्या चालू असेपर्यंतच परिणाम दिसतो पण शरीरातील आतील असमतोल तसाच राहतो म्हणजे थोडक्यात काय, मूळ प्रश्न तसाच राहतो.
पण होमिओपॅथी आजारावर नव्हे तर मूळ असमतोलावरच काम करते. औषध सुरू केल्यानंतर ब्लीडिंग होण्याचे प्रमाण कमी कमी होऊ लागते. त्याचबरोबर पेशंटला ही मानसिक दृष्ट्या आतून फ्रेश वाटू लागतं आणि हळूहळू रक्तस्राव पूर्वीप्रमाणेच होऊन नॉर्मल रेगुलर पाळी सुरू होते, म्हणजे दर पाळीला होणारे किरकोळ त्रास जे सहन करता येतात तेवढेच सुरू राहतात.
अशा प्रकारे होमिओपॅथी चिकित्सा असमतोल दूर करून रुग्णाच्या शरीरात समतोल साधते. मुख्य म्हणजे होमिओपॅथीचे साईड इफेक्ट्स काही नसतात ती एकूणच शरीराला व आरोग्यालाही फायदेशीर असतात. जो त्रास होमिओपॅथीच्या गोळ्यांनी कमी होतो त्यासाठी शस्त्रक्रिया कशाला हवी?
डॉ अजय हनमाने
एम. डी. (होमिओ) HHF, ICR Kolhapur,
चैतन्य होम्योपैथिक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4
शाहुपुरी व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
मोबाईल- 7738667123
रविवारी बंद
कृपया पुढील लेख वाचा —
वंध्यत्व – Infertility & Homoeopathy
Women’s Diseases and Homoeopathy—
Hormones play a very important role in the life and health of women. There are various stages of a woman’s life, i.e. Childhood and Puberty (Menarche), Fertility, Menopause. Physical and Mental changes take place in a woman at every stage. Not all of these changes come easily. Therefore, facing these changes and adapting to them is a test for every woman.
If the balance of Hormones is disturbed, the Health of a Woman deteriorates. Five to six days before the onset of menstruation, many women complain of depression, headache, fatigue. Pimples on the face, swelling of the legs, upset stomach, increasing obesity along with irritability and depression are also known as Pre-menstrual symptoms.
Abdominal pain is a common complaint on every menstrual day, especially on the first day. Of course, some women find this tolerable, while others experience excruciating pain.
Menstruation is called Menstruation –मासिक पाळीbecause periods usually occur every 28 days. But in many women this period ranges from 21 to 35 days. It takes about four to seven days back and forth. Young girls also have a period of 21 days to 45 days.
There are many complaints like Absence of Menstruation, Irregularity, less or more bleeding, lumps, clots. Every month, the level of Hormones in a woman’s body goes up and down. Thyroid Dysfunction – Dysfunction of the Thyroid gland is a cause of Hormonal imbalance. Apart from this DUB, Prevalence of PCOD is also increasing.
This is one of the signs that Hormones are out of balance in today’s stressful times.
DUB stands for Dis-Functional Uterine Bleeding – This problem is usually caused by the failure of the ovaries to release Ovum. Many complaints arise due to excessive bleeding.
PCOD stands for Polycystic Ovarian Disease –
Cysts /water lumps are formed in the ovaries which hinder the Maturation and release of Ovum. Due to this, ovulation does not take place and many symptoms appear due to imbalance of Hormones. Absence of periods, weight gain, pimples and hair on the face, hair thinning, absence of pregnancy, etc.
Sonography can diagnose PCOD. However, not every woman has all the above symptoms, because this disease is common in teenage and young girls. At that time, the person continues to seek treatment from various specialists due to the external symptoms, but due to this, the symptoms are only suppressed and the internal disease grows in strength.
A watery discharge – Leucorrhoea is also a common complaint. This discharge increases when there is a bacterial infection in the vagina. It can cause many diseases. The disease is diagnosed on the basis of other symptoms along with the Leucorrhoea.
Apart from this, nausea and vomiting is the most common complaint for about three and a half months after pregnancy.
Another important stage in a woman’s life is Menopause. At the end of menstruation, many women experience sudden HOT flushes of the face, hot ears, sweating, heart palpitations and crying for no reason, irritability. Some get sleepy while others suffer from headache and ringing in the ears. No increase in blood pressure. The mentality of some is disturbed, it creates fear. Homoeopathy has very effective and safe medicines for all such complaints.
Puberty is a very important physical-mental-emotional phase for young girls. At this age, we see girls who laugh and play and enjoy life a lot.
Homoeopathic Medicines balance Hormonal imbalance in women. Due to this, there is a change in the nature, the mind calms down by reducing the irritation, the restlessness decreases, the positive changes like hair fall, reduction in the number of pimples on the face are seen. So Homoeopathy can be a lifesaver for teenage girls.
DUB – Dysfunctional Uterine Bleeding In this case, modern treatment methods can stop the bleeding temporarily but cannot detect the dysfunction. It cannot be seen in Sonography. Because it is a Hormonal imbalance. Of course Hormonal pills are given on this. But as long as it continues, the result is visible, but the internal imbalance in the body remains the same, in short, the original question remains the same.
But Homoeopathy works not on the disease but on the underlying imbalance. Bleeding rate starts to decrease after starting the medicine. At the same time, the patient feels mentally fresh from within and gradually the bleeding returns to normal and regular periods start, i.e. the minor discomforts during each period continue as long as they are bearable.
In this way, Homoeopathy cures imbalances and balances the patient’s body. The main thing is that Homoeopathy does not have any side effects, it is beneficial to the body and health as a whole. Why do you need surgery for a problem that can be alleviated by Homoeopathic pills?
Dr Ajay Hanmane
M.D.(Hom)HHF, ICR Kolhapur,
Chaitanya Homoeopathic Clinic
1st Floor, F4,
Bhaskar Plaza Vyapari Peth,
Near Panch Bunglow Bhaji Mandai
Kolhapur, 416001
Mobile No. 7738667123
Sunday Closed.
Please Read Next Article–
Infantility