नक्की ! होमिओपॅथी तुम्हाला वाचवू शकते – Part 3 / Surely !Homeopathy Can Save You -Part 3
By Dr. Ajay Hanmane
May 20, 2023 Homeopathic and Cure
नक्की होमिओपॅथी तुम्हाला वाचवू शकते-Part3
होमिओपॅथी मध्ये आजारांवर प्रत्यक्ष उपचार कसे केले जातात ते आपण पाहूया–
व्यक्ति व्यक्तित विविधता असते, तशी वेगवेगळ्या व्याधींमध्ये ही असते. रुग्णाला वेदना होतात पण त्या वेदनेमध्ये सुद्धा खूप वैविध्यता असते. या सर्व निरनिराळ्या वेदनांच्या प्रकारावर एकच वेदनाशामक औषध कसे उपयुक्त ठरेल? ठस ठसणाऱ्या वेदना, टोचल्यासारख्या वेदना, कळयुक्त वेदना, विचित्र वेदना, दाहयुक्त वेदना , थंडीसह वेदना, घामासह वेदना, चमकणाऱ्या वेदना, सतत जागा बदलणाऱ्या वेदना... अशा अनेक प्रकारच्या वेदनांवर होमिओपॅथी मध्ये वेगवेगळी औषधे असतात.
उदाहरणार्थ डोकेदुखी मध्ये- डोके नेमके कुठे ?
कसे दुखते ?
म्हणजे उजवीकडे की डावीकडे, डोके दुखते ते कोणत्या कारणामुळे ? अवरोध अपचनाने दुखते का ?फक्त मागची बाजू दुखते का ?
आणि उलटी झाल्यावर थांबते का ?
डोकेदुखीचे प्रकार ,कारणे त्याशिवाय रुग्णाची वैशिष्ट्ये या सगळ्याचा विचार करून होमिओपॅथी मध्ये उपचार केला जातो.
केवळ रोगाचे नाव हे उपचारासाठी पुरेसं नसतं. रोग /आजार तोच असतो पण प्रत्येक आजारामध्ये रुग्णाची लक्षणे वेगवेगळ्या असू शकतात. कॅन्सरच्या काही रुग्णांना रक्त पडतं, तर काहींना भूक नाहीशी होते, तर काहींना कावीळ होते. म्हणून रोगाच्या नव्हे तर रुग्णांच्या लक्षणांवर भर दिला जातो. केवळ आजाराचं वर्णन पुरेसं नसतं. कारण आजाराचं वर्णन हा रोग असल्याचा पुरावा असतो, पण त्यावरून उपचाराचा निर्णय घेता येत नाही. परंतु सर्व लक्षणे रुग्णात हमखास असतातच असं नसतं किंवा लक्षण असूनही रुग्णाचं स्वतःचं काही वैशिष्ट्यपूर्ण असं वेगळं लक्षण असू शकतं. म्हणून पॅथॉलॉजी (Pathology) म्हणजे विकृती विज्ञानशास्त्रावर होमिओपॅथी ही अवलंबून नाही, तर प्रत्यक्ष रुग्ण निरीक्षण व त्याच्या तक्रारींच्या चिकित्सेवर भर दिला जातो.
होमिओपॅथी मध्ये रोगनिदान काहीही असो पण लक्षण समूहासाठी एक औषध परिणामकारक ठरतं. मग त्या रुग्णाची तक्रार टॉन्सिलची असो किंवा मानेवर गळू आल्याची असो किंवा पोटदुखीचे असो हे ऐकायला विचित्र वाटलं तरी खोलवर हेच प्रभावी ठरतं, म्हणजे त्याला पोटामध्ये अल्सर आहे किंवा निमोनिया आहे याच्याशी होमिओपॅथीला काही देणं घेणं नसतं असं नाही, पण त्यापेक्षाही अधिक माहितीची गरज असते.
काही औषध इंद्रियांवर अधिक प्रभावी टाकणारे असतात काही औषध ग्रंथींवर काम करणारी असतात. पण महत्त्वाचा असतो तो लक्षण समूह त्यातून स्पष्ट होणार रोगाचे आणि उपचारात प्रारूप म्हणजे आजाराचं, औषधाचं संपूर्ण पिक्चर. इथे डायग्नोसिसच्या (Diagnosis) मुळाशी जाऊन होमिओपॅथिक कसे उपचार होतात हे स्पष्ट होते.
होमिओपॅथी मध्ये मुलार्क सूक्ष्म प्रमाणात वापरून ते अधिक प्रभावी व शक्तीयुक्त प्रबलीकरण सरफेस डिस्पर्शन ( Surface Dispersion) या तंत्राच्या आधारे केलं जातं.
ऍसिडिटी, एलर्जी, बीपी सारखे आजार असोत की असाध्य मानले गेलेले जुनाट आजारवर “होमिओपॅथी” अत्यंत प्रभावी उपचार देऊ शकते, तेही कुठलीही साईड इफेक्ट्स शिवाय.
होमिओपॅथी रोगावर नव्हे, रुग्णावर उपचार करते. प्रतिकारशक्ती वाढवून त्याला पुनश्च आरोग्य प्रदान करते.
आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येक जण झटपट सुख मिळण्याच्या मागे धावत असतो. जीवनाचा वेग कमालीचा वाढला आहे. त्याचबरोबर दगदग आणि ताणतणाव वाढले आहेत. रोजच्या व्यायामालाही वेळ नाही, तेथे आरोग्याकडे कोण लक्ष देणार !!!
जेव्हा शरीर कुरकुर लागतं, दुखणं जाणवू लागतं तेव्हा तात्पुरता औषध घेऊन झटपट बरं होण्यावर भर दिला जातो. मग त्यासाठी जितकं तीव्र औषध असेल तितकं उत्तमच !
अशा औषधांमुळे वरवर आजार बरा झाल्यासारखं वाटतो, पण प्रत्यक्षात तो बरा होण्याऐवजी त्याची पाळीमुळे खोलवर रुजत जातात, असा दडपला गेलेला आजार सप्रेशन (Suppression) शरीराच्या अंतर्गत भागावर मुख्य अवयवांमध्ये बळावत जातो, म्हणजे आजार साध्या अवयवांपासून महत्त्वाच्या अवयवांकडे सरकतो. त्वचेपासून फुफ्फुसे, यकृत, हृदय इकडे पसरतो. त्याचे महाभयंकर आजारात रूपांतर होऊ शकते. रुग्णाला कल्पना येत नाही. पण जेव्हा लक्षात येते तेव्हा खूप उशीर झालेला असतो.
उदाहरणार्थ सर्वसामान्यपणे आम्लपित्त म्हणजे ऍसिडिटीचा रुग्ण तात्पुरतं वेळोवेळी औषध घेत असतो. तात्पुरतं बरं वाटतं पण त्यातून आजार वाढत जाऊन अल्सर, मूळव्याध,व्हेरिकोज व्हेन्स, हृदयविकार पर्यंत जाऊन ठेपतो.
मुळात आम्लपित्त हा आजार मनोकायिक (सायकोसोमॅटिक) स्वरूपाचा आहे. तो पूर्ण बरा न झाल्यामुळे रुग्ण वेगवेगळ्या लक्षणांसाठी वेगवेगळ्या तज्ञ डॉक्टरांकडे चकरा मारत राहतो. त्यामुळे मूळ आजार बाजूला राहून तात्पुरते उपचार घेत राहिल्यामुळे, इतर लक्षणांमध्ये सुद्धा अपेक्षित फरक न पडल्यामुळे त्याला नैराश्य येऊ लागते. माझा आजार खूपच गंभीर आहे आणि तो कधीच बरा होणार नाही असा त्याचा समज होतो. यातूनच अनेक मनोकायक म्हणजे सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स सारखे आजार उद्भवतात.
मग तपासण्यांचे सत्र सुरू होतं आणि रुग्ण एखाद्या चक्रव्यूहात अडकलेल्या प्रमाणे अडकतो व त्याची प्रकृती खालावत जाते. त्याचबरोबर शारीरिक मानसिक आणि आर्थिक नुकसान होते ते वेगळेच. त्यामुळे तात्पुरत्या उपायांवर अवलंबून न राहता, मुळापासून कायमस्वरूपी आजार नाहीसा कसा होईल, याचा विचार केला पाहिजे आणि ढळलेलं आरोग्य संतुलन परत मिळवलं पाहिजे आणि ते मिळवून देणे हेच होमिओपॅथीचे उद्दिष्ट असतं.
आजच्या धकाधकीच्या आणि ताणतणावाच्या युगातही आजार कायम स्वरूपी किंवा पूर्ण नष्ट करून रुग्णाला शारीरिक, मानसिक स्वास्थ्य मिळवून देण्याचं आव्हान होमिओपॅथी पेलू शकते, कारण शरीर आणि मन यातील नातं होमिओपॅथ अचूक ओळखतो. जेव्हा एखादा रुग्ण होमिओपॅथकडे येतो तेव्हा आजाराच्या लक्षणांचा विचार न करता रुग्णाच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाचा म्हणजे शारीरिक मानसिकतेचा अभ्यास केला जातो व त्यायोगे आजाराच्या मुळाशी पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो, म्हणजे — ?
मूळ
शारीरिक आणि मानसिक विचारांमध्ये बदल कुठून आले ?
शारीरिक मानसिक ताणतणावाचे कारणीभूत घटक कोणते ?
- रुग्णांची आनुवंशिकता..
- पूर्वी झालेल्या आजारांची माहिती.
- आजारामुळे शरीरामध्ये किंवा भौतिक गरजांमध्ये झालेले बदल.
- रुग्णाची ग्रहणक्षमता व संवेदनशीलता आणि प्प्रतिक्रिया करणारी क्षमता कशी आहे ?
- रुग्णाची सध्याची लक्षणे व आजाराचे स्वरूप कसं आहे ?
होमिओपॅथी मध्ये लक्षणांचा विचार केला जातो. मात्र लक्षणांच्या वर उपचार केला जात नाही, तर ती थेट थांबविण्यावर लक्ष केंद्रित केलं जात नाही. लक्षणांचा वापर केला जातो तो प्राकृतिक असंतुलनाचा शोध घेण्यासाठी. कुठल्याही व्यक्तीच्या शरीर स्वभावानुसार ज्या शारीरिक मानसिक प्रतिक्रिया देत असते त्या सर्वसाधारण लक्षणांचा विचार केला जातो. शरीराच्या विशिष्ट भागावरील बदलांचा व लक्षणांचा नव्हे तर सर्वकष लक्षणांचा, तसेच शरीरस्वभावातील बदलांचा पूर्णपणे विचार केला जातो. अशा सर्व बाबींचा विचार, अभ्यास करून रुग्णाचं एक सर्वसमावेशक चित्र बनवलं जातं. त्याला पोर्ट्रेट ऑफ डिसीज (Portrait of Disease) म्हणतात आणि ही लक्षणांची रूपरेखा किंवा आराखडा औषधाच्या रुपरेखेशी जुळवून, मग रुग्णाला शरीरप्रकृतीनुसार औषध दिलं जातं. औषध दिल्यानंतर रुग्णाच्या प्रकृतीत सर्वसाधारण पातळीवर सुधारणा किती आहे यावर भर असतो.
म्हणून होमिओपॅथी आजाराला नव्हे तर रुग्णाला बरं करत असते. होमिओपॅथिक औषधोपचारांमुळे वेगवेगळ्या तज्ञांकडे,स्पेशालिस्टकडे जाण्याची गरज संपुष्टात येऊन आजार निर्माण होण्याची साखळीत संपुष्टात येते. औषधांची मात्रा ठरवताना आजाराचा वेग ,आजाराची खोली, आजाराचा कालावधी, रुग्णाने आजाराच्या प्रक्रियेला दिलेले प्रतिक्रिया या गोष्टींचा प्रामुख्याने विचार केला जातो.
वाढते प्रदूषण ताण-तणाव, आजारांचं वाढतं प्रमाण आणि दिवसेंदिवस महागडे होत चाललेले वैद्यकीय उपचार अशा परिस्थितीत निःसंशय कमी खर्चिक असलेली, त्रासदायक आजारांवरही हळुवारपणे उपचार करणारी होमिओपॅथी औषध पद्धती म्हणजे आरोग्याची संजीवनीच आहे.
डॉ अजय हनमाने
एम. डी. (होमिओ) HHF, ICR Kolhapur,
चैतन्य होम्योपैथिक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4
शाहुपुरी व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
मोबाईल- 7738667123
रविवारी बंद
कृपया पुढील लेख वाचा
– होमिओपॅथी आणि शस्त्रक्रिया
———————————————————
Surely! Homeopathy Can Save You – Part 3
Let’s see how diseases are actually treated in Homoeopathy—
There is variation from person to person, as are different diseases. The patient experiences pain but that pain is also very varied. How can a single pain reliever help with all these different pain types? Homoeopathy has different medicines for many types of pain such as Throbbing pain, stabbing pain, stitching pain, strange pain, inflammatory pain, pain with chills, pain with sweat, flashing pain, constant shifting pain…
For example, in a Headache – where exactly is the head? How does it hurt? That is, right or left? What causes the headache? Does the Headache due to constipation with indigestion? Does it only hurt the backside? And does it stop after vomiting? The type of headache, its causes and the characteristics of the patient are treated in Homoeopathy.
Mere name of the disease is not enough for treatment. The disease / illness is the same but the symptoms of the patient may be different in each disease. Some cancer patients bleed, some lose appetite, and some get jaundice. Hence the emphasis is on the symptoms of the patients and not the disease. Merely describing the disease is not enough. Because the description of the disease is the proof of the disease, but the treatment cannot be decided from it. But not all the symptoms are guaranteed in the patient or despite the symptoms, the patient may have a different symptom that is unique to him.
Hence Homoeopathy does not rely on Pathology but emphasizes on actual patient observation and treatment of his complaints. In Homoeopathy, a medicine is effective for a group of symptoms irrespective of the diagnosis. So whether the patient complains of tonsils or neck abscess or stomach ache, as strange as it may sound, deep down it’s effective, it’s not that Homoeopathy has anything to do with stomach ulcer or pneumonia, but more information is needed.
Some drugs are more effective on the senses while others are more effective on the glands. But what is important is the group of symptoms, it will be clear from it the whole picture of the disease and the treatment. Here it is clear how Homoeopathic treatment is done by going to the root of the diagnosis.
In Homoeopathy, Mother Tincture is used in minute amounts to make it more effective and potent, based on the technique of Surface Dispersion.
“Homoeopathy” can provide highly effective treatment for diseases like Acidity, Allergy, BP or chronic diseases considered incurable, that too without any side effects.
Homoeopathy treats the patient, not the disease. Boosts immunity and restores health.
In today’s age of competition, everyone is chasing instant gratification. The pace of life has increased tremendously. At the same time, anxiety and stress have increased. There is no time for daily exercise, who will pay attention to health!!!
When the body starts complaining or pain is felt, the emphasis is on quick recovery by taking temporary medicine. So the stronger the medicine, the better!
Such drugs appear to cure the disease, but instead of curing it, it takes deep root due to its cycle, the suppression of the suppressed disease is strengthened on the inner part of the body in the major organs, i.e. the disease moves from the simple organs to the vital organs.
From the skin, it spreads to the lungs, liver, and heart. It can turn into a terrible disease. The patient has no idea. But when you realize it is too late. For example, generally amalapitta (Acidity)means a patient of acidity is temporarily taking medicine from time to time. Temporarily it feels good, but the disease progresses to ulcers, piles, varicose veins, and heart disease.
Acidity is basically a psychosomatic disease. As it is not completely cured, the patient keeps visiting different specialists for different symptoms. Therefore, due to temporary treatment aside from the original disease, he becomes depressed due to the lack of expected change in other symptoms as well. His society thinks that my illness is very serious and that it will never be cured. This is what causes many mental illnesses such as Psychosomatic Disorders.
Then the examination session- Investigations begins and the patient gets stuck in a maze and his condition deteriorates. At the same time, physical, mental and financial damage is different. Therefore, instead of relying on temporary remedies, one should think about how to get rid of the disease permanently from the root and restore the disturbed health balance and this is the aim of homeopathy.
Even in today’s stressful and strinful era, Homoeopathy can meet the challenge of permanently or completely eliminating the disease and bringing back physical and mental health to the patient, because Homoeopathy accurately recognizes the relationship between body and mind. When a patient comes to a Homoeopath, regardless of the symptoms of the disease, the whole personality of the patient i.e. the physical mind is studied and thereby an attempt is made to reach the root of the disease, i.e. — ?
- Where did the original physical and mental changes come from?
- What are the causes of physical and mental stress?
- Genetics of patients..
- Information about previous illnesses.
- Changes in body or physical needs due to illness
- How is the patient’s receptivity and sensitivity and responsiveness?
- What are the patient’s current symptoms and nature of the disease?
Symptoms are considered in Homoeopathy. But if the symptoms are not treated, the focus is not on stopping them directly. Symptoms are used to detect Natural imbalances. The physical and mental reactions that any person’s body gives according to its nature are considered as general symptoms. Not just the changes and symptoms of a specific part of the body, but the overall symptoms, as well as the changes in the body’s nature are fully considered.
A comprehensive picture of the patient is made by considering and studying all such matters. It is called Portrait of Disease and by matching this symptom profile or outline with the drug profile, then the patient is given medicine according to the anatomy.
Emphasis is placed on the general improvement in the patient’s condition after administration of the drug. Therefore, Homoeopathy cures the patient and not the disease. Homoeopathic medicines eliminate the need to go to different specialists and end the chain of disease. While determining the dosage of the medicine, the speed of the disease, the depth of the disease, the duration of the disease, the patient’s response to the disease process are mainly considered.
In such a situation of increasing pollution stress, increasing number of diseases and medical treatment which is becoming expensive day by day, the Homoeopathic medicinal system which is undoubtedly less expensive and gently treats even painful diseases is the revitalization of health.
Chaitanya Clinic
Dr. Ajay Hanmane
MD (Hom)
Bhaskar Plaza,F4
Shahupuri Traders Peth, Kolhpur
7738667123
Please Read Next Article – Homoeopathy & Surgery