प्रत्येक पॅथीचं आपलं आपलं शास्त्र असतं. त्याप्रमाणे प्रत्येक पॅथीचे डॉक्टर्स उपचार करीत असतात. कोणतीही पॅथी रुग्णाला बरं करण्याचाच प्रयत्न करीत असते. रुग्णाला त्रास व्हावा म्हणून कोणतेही डॉक्टर उपचार देत नसतात.
मॉडर्न मेडिसिन मध्ये साईड इफेक्ट होतात हे खरं असलं तरी त्या पॅथीची ती मर्यादा आहे. होमिओपॅथीलाही काही मर्यादा आहेतच.कोणती पॅथी श्रेष्ठ हा मुद्दा नाही आहे,तर “रुग्णाचं हित सर्वात महत्त्वाचं “.
होमिओपॅथीवर गेले 250 वर्ष टीका होतच आहे, इतकंच काय तर संशोधकांच्या निष्कर्षाचा हवाला देऊन होमिओपॅथिक ट्रीटमेंट परिणामकारक नाही असे ठरवून औषधे देखील बंद करण्यास सांगितले गेलं होतं.
होमिओपॅथी म्हणजे प्लासीबो इफेक्ट असा अनेक जणांचा आक्षेप असतो. होमिओपॅथी मध्ये औषधे अतिशय सूक्ष्म प्रमाणात किंवा कमीत कमी मात्रेमध्ये दिले जाते. ही औषधी मात्रा इतकी कमीत कमी केली जाते की शेवटी त्या साबुदाण्यासारख्या गोळ्यांमध्ये औषध नावाला देखील उरत नाही. मग जर औषधच शिल्लक नसतं तर त्याचा गुण कसा येईल ? तरीही गोळ्या घेतल्यामुळे रुग्णाला आपण औषध घेतलं आहे या कल्पनेने जे थोडं बरं वाटतं, तोच प्लासीबो इफेक्ट.
थोडक्यात आक्षेप असा आहे की, रोग नष्ट करण्याऐवजी होमिओपॅथिक औषध पेशंटला मानसिक दिलासा देऊन रोगमुक्त झाल्याच्या भ्रमात ठेवतात आणि हा फक्त भास असतो, असं अनेक विद्वानांचा आक्षेप आहे.
गेली अडीचशे वर्षे जगभरा मधील होमिओपॅथिक डॉक्टरनी जे करोडो रुग्णांवर उपचार केले ते आज पर्यंत रोगमुक्त झालेल्या भ्रमात जगत आले आहेत का ? कॅन्सर चे रुग्ण” जेव्हा त्यांच्या वेदना थांबल्या आहेत असे सांगतात” तेव्हा त्यांना काय भास होतो म्हणायचा का? आधुनिक वैद्यक तपासणीमध्ये अनेक कॅन्सरचे पेशंट नॉर्मल असल्याचा रिपोर्ट येतो, त्यांची कॅन्सरची गाठ नाहीशी झालेली दिसते, याला देखील प्लासीबो इफेक्ट म्हणायचे का ?
होमिओपॅथीने अनेक शस्त्रक्रिया देखील टाळता येतात. त्यामुळे हा आक्षेप अतिशय चुकीचा आहे हे लक्षात येतं.
होमिओपॅथिक औषधे अत्यंत सूक्ष्मिकीकरणानंतर (विरलीकरणानंतर) त्या साबुदाण्यासारख्या गोळ्यांमध्ये औषधाची गुण कसे काय टिकून राहतात ? याचं बरंच संशोधन झालं आहे. परंतु संपूर्ण समाधानकारक स्पष्टीकरण अद्याप मिळालेला नाही हे जरी खरं असलं तरी प्रत्यक्ष येणारा अनुभव कसा काय नाकरता येईल ?
उदाहरणार्थ नारळाच्या आत पाणी कसं काय असतं हे जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत आत पाणी आहे हेच आपण मान्य करणार नाही का? असा हा पवित्र आहे. होमिओपॅथिक पद्धती ही शास्त्रीय पद्धत आहे का ? तर हो नक्कीच.
माझ्या लिखाणातून होमिओपॅथी विषयीचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.
“होमिओपॅथी थोतांड आहे त्यात नावालाही औषध नसतं “ अशा व्यक्तव्य करणारी मंडळी, नव्याने जीवन प्रदान करणाऱ्या होमिओपॅथीच्या डॉक्टरांवर एक अर्थी अन्याय करीत असतात. पण मला खात्री आहे वर्षानुवर्षे एखाद्या त्रासाने हैराण झालेल्या रुग्णांना “आपल्यालाही बरं वाटू शकतो” असा दिलासा मिळू शकेल. आपल्या प्रियजनांच्या आजारपणामुळे खंतावलेल्यानाही उपचाराची दिशा दिसू शकेल. मेडिकल शास्त्रामध्ये उपचारांना पुरेसा प्रतिसाद न देणाऱ्या रुग्णांसाठी हा एक पर्याय सापडू शकेल.
होमिओपॅथीच्या क्षमता आणि मर्यादा दोन्ही समजून घेणे गरजेचे आहे.
एखाद्या डॉक्टरच्या अनुभवावरून पॅथीचे यश किंवा अपयश ठरवता येत नाही. होमिओपॅथी ही अतिशय प्रभावी औषधपद्धती आहे, पण इतकी सोपी नाही की केवळ पुस्तक वाचून कोणीही द्यावे.
वाचकांना मी इतकच सांगू शकतो की, शक्य असेल तेव्हा सेकंड ओपिनियन घ्यायला विसरू नका. ऑपरेशन, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होण्यपूर्वी, महागड्या टेस्ट करण्यापूर्वी, होमिओपॅथ डॉक्टरांचा सेकंड ओपिनियन अवश्य घ्या. नक्कीच तुम्हाला एक पर्याय सापडू शकेल.
How effective is Homoeopathy? — Every PATHY has its own science. Doctors are treating every pathology like that. Any pathy tries to cure the patient. No doctor gives treatment to cause suffering to the patient.
Although it is true that there are side effects in modern medicine, that is the limit of that pathy. Homoeopathy also has some limitations. It is not a matter of which pathy is superior, but “the best interest of the patient“.
Homeopathy has been criticized for the last 250 years, so much so that even the medicines were called to be stopped citing the findings of researchers who decided that Homeopathic treatment was not effective. Many people object that homeopathy is a placebo effect.
In Homoeopathy, medicines are given in very minute or minimal amounts. This medicinal quantity is reduced to such a minimum that eventually there is no medicine left in the sago-like pills. So if the medicine is not left, how will its quality be? However, the placebo effect is what makes the patient feel a little better about taking the medicine because of taking the pills.
In short, the objection is that instead of eradicating the disease, Homeopathic medicine gives mental relief to the patient and gives the illusion of getting rid of the disease. Have the millions of patients who have been treated by Homeopathic Doctors all over the world for the last two and a half hundred years, have been living in the illusion of being disease-free? What do cancer patients mean when they “say their pain has stopped”? In modern medical examination, many cancer patients are reported to be normal, their cancer tumor seems to have disappeared, is this also called placebo effect?
Many surgeries can also be avoided with Homeopathy, so this objection is very wrong.
How do Homoeopathic medicines retain their medicinal properties in those sago-like pills after being highly micronized (diluted)? It has been researched a lot. But even if it is true that, a fully satisfactory explanation has not yet been found, how can one deny direct experience?
For example, until we know what water is inside a coconut, will we not accept that there is water inside? This is sacred. Is Homeopathic method a scientific method? So YES, of course.
My writings have tried to dispel the misconceptions about Homoeopathy.
Those who express that “Homoeopathy is trivial, it does not even have a medicine in name” are doing a serious injustice to the new life-giving homeopathic doctors. But I’m sure patients who have struggled with a problem for years can take comfort in the fact that “we can feel better too.” Even those who are saddened by the illness of their loved ones can see the direction of healing. In medical science, it can be found as an option for patients who do not respond adequately to treatment.
It is important to understand both the Potential and Limitations of Homoeopathy.
A doctor’s experience cannot determine the success or failure of a therapy. Homoeopathy is a very effective system of medicine, but it is not so simple that one can just read a book.
All I can say to the readers is “don’t forget to get a second opinion whenever possible. Before surgery, admission to hospital, before expensive tests, always get a second opinion from a Homoeopathic doctor. Surely you can find an alternative.